मुंबई लोकलला मिळणार सुरक्षा कवच
कवच ही एक स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीमुळे रेल्वेगाड्यांचा वेग, सिग्नल आणि समोर येणाऱ्या गाड्यांमधील अंतरावर सतत लक्ष ठेवले जाते. चालकाकडून चुकून सिग्नल दुर्लक्षित झाला किंवा वेग जास्त झाला तरी ही कवच प्रणाली आपोआप ब्रेक लावून अपघात टाळणार आहे, त्यामुळे समोरासमोर धडक, सिग्नल तोडणे अशा घटना रोखणे शक्य होणार आहे.
advertisement
या प्रकल्पाअंतर्गत 60 किलोमीटर मार्गावर टॉवर उभारणीसाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. टॉवर उभारणीचे सुमारे 50 टक्के काम झाले असून 15 पैकी 14 ठिकाणी माती परीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी 12 ठिकाणी पायाभरणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय अन् बांधकामेही सुरू आहेत.
संपूर्ण प्लॅन काय आहे?
17 स्थानकांवर टीसीएएस बसवण्यात येणार असून त्यापैकी सहा स्थानकांवर काम पूर्ण झाले आहे. याशिवाय लिडार सर्वेक्षण, आरएफआयडी टॅग बसवणे आणि ऑप्टिकल केबल टाकण्याचे कामही सुरु आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत प्रणालीची चाचणी घेण्यात येत असून आतापर्यंत 24 किलोमीटर मार्गावर इंजिन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.
