नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
'संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नॅशनल हेरॉल्डवर काल अचानक कारवाई झाली. पंडित नेहरूंनी स्थापन केलेलं ते ऐतिहासिक वृत्तपत्र आहे. नॅशनल हेरॉल्ड हळूहळू स्पर्धेत मागे पडलं असेल, हेरॉल्डला जगविण्यासाठी काही व्यवहार झाले. जे भाजपात गेले त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या नाहीत. सरकार पराभवाच्या भीतीनं घाबरलेलं आहे. ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे, आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यावरून देखील भाजपवर निशाणा साधला होता. फायनलचे सामने एक तर मुंबईत वानखेडे मैदानावर होतात नाही तर दिल्लीच्या मैदानावर होतात. मात्र हा सामना अहमदाबादला झाला, क्रिकेटमध्ये राजकी लॉबी घुसली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
