TRENDING:

Mumbai: स्कुल बसने मायलेकीचा चिरडलं, 9 महिन्याचं बाळ चाकाखाली सापडलं, मन विचलित करणारा VIDEO

Last Updated:

मुंबईतील  खेतवाडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुलाबा परिसरातील जे बी सोमण शाळेची ही बस होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्पिकर अंगावर पडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मुंबईतील खेतवाडी परिसरात शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत एक महिला नऊ महिन्याचं बाळ बसखाली सापडलं. या अपघातात महिलेल्या हातात असलेल्या नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील  खेतवाडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुलाबा परिसरातील जे बी सोमण शाळेची ही बस होती. विद्यार्थ्यांना सोडून बस पुढे चालली होती. त्याच वेळी एक महिला हातात ९ महिन्याच्या बालिकेला आणि दुसऱ्या हातात चिमुरडीला घेऊन रस्ता ओलांडत होती.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, ही महिला आपल्या मुलीला बसमधून उतरल्यानंतर घरी घेऊन चालली होती. ही महिला बसच्या समोरून मुलीला घेऊन जात होती. त्याचवेळी स्कुल बस चालकाने बस पुढे घेतली. बसची धडक बसल्यामुळे महिला आणि मुलगी खाली कोसळले. काही कळायच्या आत महिला चाकाखाली सापडली तर मुलगी ही बाजूला फेकली गेली.

advertisement

या घटनेत महिलेच्या हातात ९ महिन्याची मुलगी होती. बसच्या चाकाखाली सापडून ९ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी धाव घेऊन जखमी महिलेला बाहेर काढलं. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI आधारित तूर उत्पादन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना मिळणार आता अधिक नफा, अशी करा शेती
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. महिला गंभीर जखमी असून तिच्या हातात असलेल्या नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  सध्या पोलीस तपास करत असून स्कूल बसचा वाहन चालक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: स्कुल बसने मायलेकीचा चिरडलं, 9 महिन्याचं बाळ चाकाखाली सापडलं, मन विचलित करणारा VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल