मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासमध्ये कर्मचाऱ्यांना केली मारहाण प्रकरण आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या कॅश बॅग प्रकरणामुळे चांगलाच वाद पेटला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांच्या कृत्यावर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. एवढंच नाहीतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आणि गृहमंत्री योगेश कदम यांच्या सावली बार प्रकरणंही समोर आलं होतं. पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना नेत्यांच्या या प्रकरणांमुळे एकनाथ शिंदे हे बॅकफुटवर गेले होते. शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी भाजपच्या गोटातून नाराजी होती.
advertisement
उदय सामंत दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले होते. सामंत दिल्लीवरून परतले. ते सामंत विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधणार होते. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर दाखल झाले. यावेळी सामंत आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. पण या चर्चेची तपशील समोर येऊ शकली नाही. त्यानंतर शिंदे हे दिल्लीला रवाना झाले.
दिल्लीत कुणाची घेणार भेट?
राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशी चर्चा आहे. संध्याकाळी ७ वाजता राज्यसभेत अमित शहा यांचं भाषण होणार आहे. या भाषणानंतर एकनाथ शिंदे हे शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान शिवसेनेचे ४ मंत्री हे वादग्रस्त आहे. त्यांची बदली करावी, अशी मागणी सत्ताधारी गटामध्ये होत आहे. भरत गोगावले यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
