याच ट्रेंडमध्ये परवडणाऱ्या किंमतीत स्कर्ट उपलब्ध होणारा एक स्टॉल रानडे रोडवर रोज लावला जातो. दादर पश्चिम रेल्वे स्टेशनपासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर, दोरी फॅशनच्या समोर हा स्टॉल दिसतो. येथे फक्त 200 रुपयांपासून लाँग साईज आणि पूर्ण घेर असलेले कॉटन स्कर्ट मिळतात.
या स्कर्टमध्ये विविध प्रकारच्या प्रिंट्स आढळतात. त्यामध्ये—
- इकत प्रिंट
- कलमकारी प्रिंट
- अजरत प्रिंट
- बांधणी प्रिंट
- बुट्टा आणि फ्लोरल प्रिंट्स
- मधुबनी टच असलेले प्रिंट्स
- जयपुरी कॉटन, रेऑन कॉटन आणि इतर हलक्या फॅब्रिकमध्ये मिळणारे हे स्कर्ट चालताना फुल-घेरमुळे व्यवस्थित फ्लो देतात आणि त्यांचा लूक अधिक खुलतो.
advertisement
हा स्टॉल सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेत उघडा असतो, त्यामुळे त्या वेळेत अनेक मुली विविध प्रिंट्स पाहून आपल्याला आवडणारी डिझाईन निवडतात. परवडणारी किंमत आणि उपलब्ध विविधता यामुळे हे स्कर्ट अनेकांच्या नजरेत भरत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
फक्त 200 रूपयांपासून सुरूवात, मुलींसाठी फॅन्सी कॉटन स्कर्टसाठी मुंबईतलं 'हे' बेस्ट ठिकाण