शॉपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे 2 महिन्याच्या बाळा पासून ते मुली, स्त्री यांसाठी वेगवेगळे फॅन्सी कपडे ड्रेस तसेच जीन्स, लेंगा, टॉप, कुर्ती कमी भावात आणि योग्य दरात उपलब्ध आहेत.दिवाळी साठी स्पेशल ऑफर या एल.के.गारमेंट्स मध्ये आहे. इथे पार्टी व्हेअर तसेच लग्न समारंभ, लहान मुलांचे प्रोग्राम वाढदिवस सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. हा शॉप स्टेशनपासून जवळ असल्याने शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील स्त्री इथे वेगवेगळ्या व्हरायटी तसेच विकत घेण्यासाठी येतात.
advertisement
एल.के.गारमेंट्स मध्ये कॅटलॉग दाखवून ऑर्डर करण्याची पद्धत काही वर्षांपासून खूप फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे एखाद्या महिलेला शॉपमध्ये प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीत फोटो किंवा व्हिडिओ पाठवून हवे असलेले ड्रेस मटेरियल कपडे ऑर्डर करू शकतात. त्यामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीचा मोठा फायदा होतो. महिन्याला वार्षिक सण उत्सव,लग्न समारंभ, वाढदिवस यासाठी लागणारे वेगवेगळ्या व्हरायटी ग्राहकांना हव्या असलेल्या किंमतीत उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांनाच वार्षिक उत्पन्न ही 15 लाखाच्या वर जातो.
जसा मोहळ तसा कपड्यांचा खप वाढल्याने त्यांना त्याचा फायदा होतो. आज 15 वर्ष होतील ते आंबिवली मध्ये हा व्यवसाय करतात.सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद नव्हता मिळाला. त्यामुळे त्यांनी लोकांना कोणत्या साड्या कपडे अपेक्षित आहेत त्या नुसार कुर्ती कपडे साड्या मागू लागले. मुख्य म्हणजे इथे हवामानानुसार कपडे कापड उपलब्ध असतो. त्यामुळे ग्राहकांची मागणी ही त्या त्या वेळेनुसार वाढत राहते.नतसेच कमी किंमतीत स्त्री यांना कपडे मिळू लागल्याने या शॉप कडे आकर्षित होतात. दिवाळीसाठी चांगले व्हरायटी ग्राहकांना अपेक्षित आणि कमी रेंज मध्ये उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.