मुंबई : राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईतील घाटकोपर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 9 लाख रुपये किंमतीची ड्युटी फ्री बनावट निदेशी मद्य साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षाच्यानिमित्त तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ आचारसंहिताच्या अनुषंगाने राज्य उत्पादक शुल्क विभागाने घाटकोपरमधील एक इसम अवैद्य दारूचा साठा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला आणि दुचाकी वाहनाद्वारे विविध ब्रॅडच्या ड्युटी फ्रि स्कॉच मद्याच्या बनावट बाटल्या ताबे कब्जेत बाळगून वाहतूक करीत असलेल्या इसमास ताब्यात घेतलं. सदर इसमाकडून प्राप्त माहितीवरुन देवनार कॉलनी परीसरात विविध टिकाणी छापे टाकण्यात आले.
बनावट स्कॉच जप्त आणि कारखाना उद्ध्वस्त
या कारवाईमध्ये अवैध बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य मद्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, बनावट स्टीकर्स आणि बाटली सिलबंद करण्याकरिता हिटगन असा एकूण अंदाजे रु. ९,१२,८६५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात सहभागी इसम नामे गणेश पराग चौहान आणि संजय शांती वाघेला यांना महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे कलम ६५ (अ) (ब) (क) (ड) (ई) (फ), ८१, ८३,९० अन्वये अटक करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, एल विभाग, मुंबई उपनगर-२ कार्यालयाने अवैध बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, बनावट स्टीकर्स, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, हिटगन आणि दुचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. मा. श्री. पी. पी. सुर्वे साहेब, सहआयुक्त अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, निलेश सांगडे साहेब, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, बृहन्मुंबई विभाग, चरणसिंग राजपूत साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर- २, मनोज चव्हाण, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर- २ यांच्या मार्गदर्शनाखाली एल विभाग, मुंबई उपनगर- २ चे निरीक्षक शिवशंकर पाटील, अनिल राठोड, दुय्यम निरीक्षक, एल-२ विभाग मुकुंद परांडकर दुय्यम निरीक्षक एल-१ विभाग, श्रीमती वैशाली यादव दुय्यम निरीक्षक एल-३ विभाग, तसंच जवान वर्ग मोहन सोनटक्के, पूजा राऊत आणि सागर तडवी यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास अनिल राठोड, दुय्यम निरीक्षक, एल-२ विभाग, मुंबई उपनगर-२ हे करीत आहेत.
अशा प्रकारेचे बनावट ड्युटी फ्रि मद्य विकत घेऊ नये तसंच बनावट मद्य तयार करुन विक्री करणान्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअॅप क्र. ८४२२००१९३३ व टोल फ्रि क्र.१८००८३३३३३३ यावर देण्यात यावी. असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलं आहे.
