मुंबई : चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौरपदाच्या निवडीवरून हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे सत्ता स्थापनेचे पेच निर्माण झाला होता. अखेरीस या वादावर आता पडदा पडला आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाला चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चंद्रपूर पालिकेत सत्ता स्थापनेबद्दल चर्चा झाली. ठाकरे गटाने आता काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"मातोश्री मध्ये चर्चा झाली. आम्ही विनंती केली महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहावं. त्यांचा प्रस्ताव होता महापौर आणि स्थायी समिती अडीच वर्ष द्यावा हा प्रस्ताव दिला. मी सांगितलं काँग्रेस मोठा पक्ष आहे. काँग्रेस अडीच वर्ष महापौर असावा असं सांगितलं .विनायक राऊत आणि अनिल देसाई यांना जबाबदारी दिली काँग्रेससोबत चर्चा करा. अकोला ,परभणीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही पाठिंबा देत आहे, महापौर होण्यासाठी एकत्र बसून मदत केली पाहिजे. शिवसेना सकारात्मक आहे. महापौर कोणाला द्यायचा यावर प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. यात कोणतीही अडचण येणार नाही. महाविकास आघाडी, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती ही पद राहिली पाहिजे. यातून तोडगा निघेल, असं राऊत म्हणाले.
"त्यांच्याकडे महापौर होण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक अवलंबून आहे. ते जे बोलतात ते तोंडाच्या वाफा काढणे आहे. त्यांच्या जिभेला हाड नाही किशोर जोरगेवार बरोबर काँग्रेसचा गट जाईल का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
"पक्षात काही गोष्टी होतात पण चर्चा करून मार्ग निघतो. पाठिंबा मिळाला की महापौर होणार आहे. आम्ही मिळून ४२ नगरसेवक होतो. सगळी पद वाटप होईल. काँग्रेसचा महापौर व्हावा हे माझे प्राधान्य आहे. पक्ष म्हणून एकत्र यावे लागतात. जिल्हा परिषद निवडणूक चर्चा झाली मुंबईत उद्याच्या दृष्टीने निवडणूक वेगळ्या लढल्या तरी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस विरोधात भूमिका मांडली नाही. निवडणुका वेगळ्या लढलो तरी एकत्र सत्तेत विरोधात लढायला पुरून उरतील, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.
भाजप शिंदे गटाला काहीच देणार नाही - संजय राऊत
"महाविकास आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अडचण नाही.आधी ते आमच्या बरोबर होते.
सत्ता सोडून बाहेर पडत असतील हिंमत दाखवत असतील तर सलाम आहे. पण मला वाटत नाही भाजप निशाण्यावर ठाणे आहे, मग नाशिकमार्गे पुणे जाऊ शकतात. अनेक ठिकाणी अद्याप गटनोंदणी झालेली नाही. भाजप हा पक्ष शिंदे शिवसेनेला स्थायी समिती आणि महापौर पद देण्याच्या भूमिकेत नाही. त्यामुळे शिंदे शिवसेना ही नाराज झाली आहे. त्या नाराजीचे काय होणार हे येणाऱ्या काळात कळेल. सोबत असलेल्या सरदारांचे सुभे उध्वस्त करायचे आणि आपली गादी मजबूत करायचे सुरू आहे. सगळं काही अलबेल सुरू आहे, असं काही वाटत नाही सोबत असलेल्या दोघांची ताकद नाही त्यामुळे जे देतील त्यावर जगणे असं सध्या आहे, असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित
"मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत अर्धा तास आम्ही चर्चा केली आणि चंद्रपूर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता यावी ही विनंती केली. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत आणि 100% त्यांना सत्ता व्हावी अशी इच्छा आहे. महापौरपद अडीचं वर्षासाठी हवं असेल तर तयारी ठेवली पाहिजे आणि स्टँडिंग देखील अडीच वर्ष असावं ही इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ - वडेट्टीवार
तसंच, आता प्रदेशाध्यक्ष सोबत चर्चा करेन. चंद्रपूर महापालिकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो इथेही एकत्र आलो तर मजबुतीने कामं करू, यातून चांगलं घडेल असं वाटतं. अडीच वर्ष महापौर करावं, असं ते बोले आमची त्याला अडचण नाही. संख्याबळ काठावर असून चालत नाही. 5 वर्ष सत्तेत कामं करता येईल मजबूत संख्याबळ असेल तर मी प्रदेशाध्यक्ष यांच्या कानावर टाकतोय. महापौर होत असताना संदीप गिरे त्यांच्याशी चर्चा करून दोघांनी समन्वय साधून एक नावं निवडली पाहिजे. त्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं कामं ठेवलं पाहिजे. अडीच वर्ष आम्हाला पद दिलं पाहिजे ही विनंती केली आहे. संध्याकाळी पर्यंत आमचा निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
