वेटरकडे दारूची मागणी केली अन्...
हिरानंदानी मेडोज परिसरातील बार दुपारी १२ ते रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू असतो. रात्री ९ च्या सुमारास दोन मित्रांनी दारू पिण्यासाठी बारमध्ये प्रवेश केला. त्यांनी वेटरकडे दारूची मागणी केली. ते दोघे आधीच एका बारमधून तराट होऊन आले होते. त्यातच आणखी दारू पिण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या बारमधील वेटरने त्यांना दारूऐवजी लिंबू सरबत देऊ का, असे विचारले. त्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर दोघे दारूचे बिल भरून निघून गेले.
advertisement
झिंग चढताच वेटर टार्गेट
दोन दिवसानंतर त्यातील एकजण आपल्या पाच ते सहा मित्रांसोबत पुन्हा त्याच बारमध्ये दारू पिण्यासाठी आला. तर्राट झाल्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाचाबाचीची आठवण होताच त्यांनी लिंबूपाण्याची ऑफर करणाऱ्या वेटरचा शोध घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली. तसेच बारमधील साहित्यांची तुफान तोडफोड केली. या प्रकरणानंतर बारमालकाने चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.