TRENDING:

पोलीस असला म्हणून काय झालं? सामान्य पोराने दिला कायद्याचा दणका, ठाण्याचा Video वेगाने Viral

Last Updated:

ठाण्यात एका जागरूक तरुणाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे:  ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिकानगर भागात घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विनाहेल्मेट वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आलेल्या तरुणानेच ट्रॅफिक पोलिसांनाच त्यांच्या नियमांची आठवण करून दिली आहे. त्याने घटनास्थळीच पोलिसांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी हेल्मेट न घातल्यामुळे थांबवले आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र दंड भरल्यानंतर त्या तरुणाने पोलिसांना देखील नियमांची आठवण करून दिली आहे. कारण पोलिसांकडे जी दुचाकी होती, त्याला चक्क नंबर प्लेट नव्हती.

काय आहे व्हिडीओमध्ये?

तरुण - तुमच्या गाडीवर नंबर प्लेट नाही

advertisement

पोलीस - ही दुसऱ्याची गाडी आहे, जमा करायची आहे

तरुण - जमा करायची गाडी तुम्ही कशी वापरता?

पोलीस - तुला काय करायचं ते कर

तरुण - या गाडीवर नंबर प्लेट नाही आणि जमा करायला चाललो...

आम्हाला नियम पाळायला सांगता, पण तुम्ही स्वतःच नियम मोडताय का? असा थेट सवाल करत त्याने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढला. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की ट्रॅफिक पोलिसांची दुचाकी कोणतीही नंबर प्लेट नसलेली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामान्य नागरिकांनी नियम मोडला तर दंड, पण पोलिसांनी मोडला तर काय?” असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

या घटनेनंतर ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नियम अंमलात आणणाऱ्या पोलिसांनीच नियमांचे उल्लंघन केल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची दखल घेत कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
पोलीस असला म्हणून काय झालं? सामान्य पोराने दिला कायद्याचा दणका, ठाण्याचा Video वेगाने Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल