TRENDING:

लग्नासाठी लागणाऱ्या रूखवतासाठीचं सामान 50 रूपयांपासून, मुंबईमध्ये कुठे आहे 'हे' दुकान

Last Updated:

लग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्नसामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
advertisement

दत्तधुनीमध्ये रुखवताचा तयार सेट 1500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या सेटमध्ये एकूण 20 पारंपरिक वस्तू मिळतात. या पारंपारिक वस्तुंमध्ये, डोली, भडजी, सनई-चौघडे, घर, बैलगाडी, धान्याची पोती यांसारख्या लग्नविधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंचा समावेश आहे. ग्राहकांना हा सेट कस्टमाईज करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा पसंतीनुसार वस्तूंची निवड करता येते. याशिवाय येथे दगडी वस्तूंचे खास सेटदेखील उपलब्ध आहेत. पाटा–वरवंटा, जातं, दिवा, तुळस, चूल आणि उखळ अशा सहा दगडी वस्तूंचा सेट 1200 रुपयांना मिळतो. घरगुती परंपरेतील या वस्तूंना आजही विशेष महत्त्व असल्याने ग्राहक या सेटला मोठी पसंती देत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब शेतीमध्ये केला 'हा' बदल, मिळालं 18 लाख उत्पन्न, सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

लग्नविधींमध्ये आवश्यक असलेल्या ओटी, अक्षता, हळद यांसारख्या वस्तूही येथे उपलब्ध आहेत. नवरीची शाल 250 रुपये, तर सप्तपदी सुपारी 150 रुपये या दरात मिळत आहे. आंतर पाठ, ओटी बटवा तसेच विविध प्रकारच्या मुंडवल्या फक्त 100 रुपयांपासून मिळत असल्याने सर्व आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचा फायदा ग्राहक घेत आहेत. लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू परवडणाऱ्या दरात, विविध पर्यायांसह आणि पारंपरिकतेची हमी देत दादरमधील ‘दत्तधुनी’ दुकान सध्या लग्नसराईतील प्रमुख खरेदीचे आकर्षण बनले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
लग्नासाठी लागणाऱ्या रूखवतासाठीचं सामान 50 रूपयांपासून, मुंबईमध्ये कुठे आहे 'हे' दुकान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल