मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना माघार घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप होत आहे. तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी राहुल नार्वेकरांवर हे आरोप केले आहेत.दरम्यान तेजल पवार यांना ठाकरे गट आणि काँग्रेकडून पाठिंबा दिला आहे. यांसदर्भातील पत्र देखील त्यांना मिळाले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 226 मध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवारमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक 226 हा गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरला होता. राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद झाला होता. या प्रभागात अनेक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आले नाही तर काहींचे अर्ज हेच छाननी दरम्यान बाद झाले. प्रभागात फक्त दोनच उमेदवार सध्या निवडणूक लढत आहेत त्यातील एक म्हणजे भाजपाचे मकरंद नार्वेकर आणि दुसऱ्या उमेदवार म्हणजे तेजल पवार ज्या अपक्ष लढत आहेत. निवडणुकीला काहीच दिवस उरले असताना तेजल पवार यांनी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या तेजल पवार?
आम्हाला उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्याचा दावा त्यांनी केला. मानपाची कंत्राट, व्यवसाय, पैसे अशा अनेक गोष्टींचं आमिष दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे तेजल पवार यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. उमेदवारी अर्ज भरला आहे. अपक्ष असलेल्या प्रभाग क्रमांक 226 च्या अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
महायुती विरोधात अनेक पक्ष अप्रत्यक्षरित्या भिडणार
तेजल पवार यांच्या प्रचार रथावर राहुल गांधी, राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहे. ठाकरे गट आणि काँग्रेकडून पाठिंबा असल्याचं पत्र मिळाल्याची माहिती तेजल पवार यांनी दिली आहे. तेजल पवार थेट मकरंद नार्वेकरांना भिडणार असल्याने राजकीय वर्तपात चर्चांना उधाण आले आहे . महायुती विरोधात अनेक पक्ष अप्रत्यक्षरित्या भिडणार आहे.
