पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
नवी मुंबई आयुक्तालय यांच्याकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दिनाक 15/05/2024 रोजी 00.01 वाजता पासून 24.00 वाजेपर्यंत च्या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदी केली आहे.
आपल्या अधिसूचनेमध्ये उपायुक्त डॉ. राठोड यांनी म्हटले आहे की, नाशिककडून खारेगाव टोलनाका येथून डावे वळण घेउन मुंब्रा बायपासमार्गे जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील सहा चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाकांवरील माल वाहतूक करणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे 15 मे रोजी प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे न वळता मुलूंड ऐरोली मार्गे पुढे जातील. त्याचबरोबर नाशिककडून रांजणोली येथून डावे आणि उजवे वळण घेऊन कोनगाव एमआयडीसीकडून दुर्गाडी दिशेने कल्याणकडे येणाऱ्या मार्गावरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे.त्याऐवजी ही वाहने रांजनोली नाका येथून सरळ खारेगाव टोलनाका मार्गे पुढे जातील.
advertisement
वाचा - आवाज कुणाचा? PM मोदींचा मुंबईत मेगा रोड शो, ठाकरेंच्या गडाला पडणार खिंडार?
शीळ कल्याणमार्गे पत्रीपूलाकडे मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने बदलापूर चौक येथून यू टर्न घेऊन लोढा पलावा मार्गे कल्याण फाटा- महापे- आनंदनगर चेकनाका मार्गे जातील. तसेच उल्हासनगर शहरातून वालधुनी पुलावरुन कल्याणच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूकीच्या मोठ्या वाहनांना उल्हासनगर शहरात शांतीनगर जकात नाका ये प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने शांतीनगर जकात नाका येून डावे वळण घेऊन पुढे जातील. त्याचबरोबर विठ्ठलवाडीकडून वालधुनी पुलावरुन कल्याण दिशेने मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने उल्हासनगरच्या श्रीराम चौकातून पुढे जातील.
मुरबाडवरुन शहाड ब्रिज मार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या मोठया वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने म्हारळ जकात नाका येथून डावे वळण घेऊन उल्हासनगर मार्गे पुढे जातील.* नाशिक महामार्गावरुन बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण, न्हावाशेवा येथे जाण्यासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक होत आहे. ही वाहतूक बापगाववरुन गांधारी मार्गे होत असते. मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीतील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळवली चौकी येथे प्रवेश बंद राहील. त्याऐजी ही वाहने ठाण्याच्या दिशेने सरळ मुलूंड ऐरोली मार्गे पुढे जाण्याचे नियोजन आहे. अशाच प्रकारे कासारवडवली, मुंब्रा, भिवंडी, नारपोली आणि विठ्ठलवाडी भागातही काही मार्ग बंद केले असून त्याऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.