TRENDING:

Mumbai News : लालपरीच्या डेपोत 'झिंगाट' कारभार! मुंबईतल्या रेस्ट रूमचा दरवाजा उघडला अन्..., मंत्र्यांचा पारा चढला!

Last Updated:

Mumbai News : परळ एसटी डेपोच्या अचानक पाहणीत चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत आढळले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत श्वास विश्लेषक चाचणी सक्तीची केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांसह इतर कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड न करता तातडीने कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगेच निलंबित करून चौकशीअंती सेवेतून बडतर्फ करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
News18
News18
advertisement

नेमकं घडलं काय?

आज मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट देत मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. या तपासणीदरम्यान विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

advertisement

मंत्री सरनाईक काय म्हणाले?

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठरवले आहे. मात्र अशा ठिकाणी मद्यपानासारखी कृत्ये होत असतील तर ते केवळ शिस्तभंग नसून प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी अपघाताला निमंत्रण देतोच, शिवाय एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो असे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य

दरम्यान अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे सांगण्यात आले असून एसटीच्या सुरक्षा आणि दक्षता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विशेषतहा चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात यावी असे आदेशही त्यांनी दिले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
धोक्याची घंटा! भारतात 80 टक्क्यांहून अधिक मनोरुग्ण उपचारांपासून वंचित, काय घडतंय
सर्व पहा

या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे तसेच बसेसच्या नियोजनाचीही पाहणी करून प्रवाशांच्या सुरक्षितता व सोयीसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : लालपरीच्या डेपोत 'झिंगाट' कारभार! मुंबईतल्या रेस्ट रूमचा दरवाजा उघडला अन्..., मंत्र्यांचा पारा चढला!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल