अजित पवार यांनी म्हटलं की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. मला वाटतं दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख सर्वात चांगले मुख्यमंत्री होते. आपण आता युती आघाडी सरकारच्या काळात आहोत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर एका पक्षाचं सरकार येण्याची शक्यता नाही. देशमुख यांनी आघाडी सरकार चालवण्याचं धोरण विकसित केलं होतं.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्र्याचा निर्णय निवडणूक निकालानंतर महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत होईल.
advertisement
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक अशी होती. चार जागांपैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. यावर अजित पवार म्हणाले की, लोकसभेनंतर परिस्थिती बदललीय. मतदार आता महायुतीला मतदान देतील. लोकांना जाणीव झालीय की फक्त महायुतीच चांगलं करू शकते. लोकसभेवेळी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा होता पण आता परिस्थिती बदललीय. महायुतीची कामगिरी चांगली करण्यास मदत होईल.
