कशी आहे मोबाईल संगीत शाळा?
'द साउंड स्पेस ऑन व्हिल्स'ने चालती फिरती संगीत शाळा सुरू केली आहे. या उपक्रमाद्वारे कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील मुलांना संगीत शिक्षण देण्यासाठी संपूर्ण सुसज्ज संगीत क्लासरूम ऑन व्हील विविध ठिकाणी फिरत आहे. उच्च शिक्षित संगीत शिक्षक मुलांना मार्गदर्शन करतात आणि विशिष्ट सानुकूलित अभ्यासक्रमाचे पालन करतात. या सत्रांद्वारे, मुले त्यांच्या भाषेतील कौशल्ये, सर्जनशीलता, सामाजिक भावनिक कौशल्ये, संवाद कौशल्यांसह त्यांच्या संगीत कौशल्यांचा विकास करण्यासाठी ही मदत होईल, असं मत कामाक्षी खुराणा व्यक्त करतात.
advertisement
बाप्पाच्या सजावटीसाठी कुठं कराल खरेदी; मुंबईच्या या बाजारपेठेत 50 रुपयांपासून मिळतात वस्तू
30 मिनिटांनी बस बदलते जागा
या संगीत बसमुळे संपूर्ण मुंबईत राहणाऱ्या मुलांसाठी संगीतमय जगतिक दर्जाचे संगीत शिक्षण खुले होईल. ही बस मुंबईभोवती वेगवेगळ्या ठिकाणी फिरेल. जिथे मुले 30 मिनिटांसाठी प्रवेश करू शकतात आणि आमच्यासोबत संगिताचे शिक्षण घेऊ शकतात. सुमारे 20 मुलांसह हे संगीत वर्ग आयोजित करण्यासाठी एक प्रशिक्षित संगीत शिक्षक आणि स्वयंसेवक उपस्थित असतात. आम्ही या बसमध्ये विविध वाद्ये आणि इतर उपकरणांचा पुरवठा करतो. तसेच मुलांना वर्गादरम्यान हाताळता येतील अशी वाद्य पुरवतो. 30 मिनिटे पूर्ण झाल्यावर ही बस मुंबईतील वेगळ्या ठिकाणी जाईल आणि पुढील वर्गासाठी तेथे थांबेल, असं विशाला खुराणा यांनी सांगितले.