पावसाचं थैमान! शेतातच सडला कांदा, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल, सोलापुरात नुकसान
ज्या युवक आणि युवतींना पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी हवी आहे, त्यांनी https://rrc-wr.com/ या वेबसाईटला जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. पण अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी https://rrc-wr.com/rrwc/Files/2632.pdf या वेबसाईटला जाऊन शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज शुल्क यासह अधिक माहिती जाणून घ्या. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्याप सुरूवात झालेली नाही. येत्या 24 सप्टेंबरपासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून अर्ज भरण्यासाठी सुरूवात होणार आहे. तर, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर आहे. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
नवरात्रीत 9 दिवस असे करा उपवास, जाणून घ्या सोप्या टीप्स
स्काउट अँड गाईड (Level 1) आणि स्काउट अँड गाईड (Level 2) अशा दोन पदांसाठी पश्चिम रेल्वे ही भरती करीत आहेत. स्काउट अँड गाईड (Level 1) साठी 12 पदांसाठी तर, स्काउट अँड गाईड (Level 2) साठी 2 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अनुक्रमे पहिल्या पदसाठी अर्जदार 10वी किंवा ITI उत्तीर्ण हवा अशी शैक्षणिक पात्रता आहे. स्काउट अँड गाईड (Level 2) साठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण हवी अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. शिवाय इतर पात्रताही पश्चिम रेल्वेने उमेदवारांना दिल्या आहेत. कोणत्याही विभागात स्काउट/ गाईड/ रोव्हर/ रेंजर किंवा हिमालयन वुड बॅज (HWB) उमेदवार अध्यक्ष असावा.
नवरात्रीत या गोष्टी घरी आणा, अडचणींपासून होईल सुटका!
शिवाय, गेल्या 5 वर्षांपासून म्हणजेच 2020- 21 पासून स्काउट्स संघटनेचा सक्रिय सदस्य असावा. “सक्रियतेचे प्रमाणपत्र” परिशिष्ट ‘अ’ नुसार असले पाहिजे सोबत जोडलेले असावे. राष्ट्रीय स्तरावरील किंवा अखिल भारतीय रेल्वे स्तरावरील दोन कार्यक्रम आणि राज्य स्तरावरील दोन कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग नोंदवलेला असावा. पहिल्या पदासाठी 18 ते 33 वयापर्यंत वयाची अट आहे. तर दुसर्या पदासाठी 18 ते 30 पर्यंतची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत वयाची सुट देण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत वयाची सुट दिली आहे.
भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचं मुंबईत उद्घाटन...
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रियाही ऑनलाईन असून शेवटची तारीखही एकच आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. दरम्यान, खुले प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असणाऱ्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क 500 रूपये भरायचे आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि महिलांना 250 रूपये फी भरायची आहे. अजून अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली नसून अर्ज भरण्यास सुरूवात होताच इच्छूकांनी अर्ज भरावा. अर्ज भरण्यापूर्वी नोकरीसंबंधितची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.