TRENDING:

Mumbai Weather Alert : नवी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाकडून अलर्ट

Last Updated:

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. काही दिवस कोरडे हवामान अनुभवलेल्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आता जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. काही दिवस कोरडे हवामान अनुभवलेल्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आता जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील DY पाटील स्टेडियमवर सुरू असलेली महिला क्रिकेट मॅच जोरदार पावसामुळे थांबवावी लागली आहे. पावसाचा जोर वाढताच मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले.
नवी मुंबई ठाण्यात रेन स्ट्राईक ; मुसळधार पावसाने मॅच थांबवली हवामान विभागाचा 3 द
नवी मुंबई ठाण्यात रेन स्ट्राईक ; मुसळधार पावसाने मॅच थांबवली हवामान विभागाचा 3 द
advertisement

ऑक्टोबरमध्येच पुन्हा पावसाचा जोर

साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाचा जोर कमी होतो, पण यंदा हवामानात अचानक बदल झाल्याने पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात आज (23 ऑक्टोबर) सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि दमट हवा होती, मात्र दुपारनंतर जोरदार सरी कोसळू लागल्या. नवी मुंबईतील खारघर, वाशी आणि बेलापूर परिसरात तर सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाचा जोर दिसून आला.

advertisement

हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील काही तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीतील गोड पदार्थासोबत चटपटीत खायचंय? घरीच बनवा केळीचे चिप्स, रेसिपीचा Video
सर्व पहा

या काळात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळी वारे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Weather Alert : नवी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल