गोव्यात बनस्ट्रीम पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. यात 5 वाहनांची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना असा संशय आहे की पुलावर काही लोक दारू पिऊन गाडी चालवत होते. याच कारणामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत
advertisement
Accident News: धावत्या ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् तिघांचा क्षणात शेवट, गडचिरोलीतील घटना
सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, की हाय एंड कार मर्सिडीजने इतर गाड्यांना धडक दिली. मर्सिडीजने 3 ते 4 कारला जोरात धकड दिल्याने यात तिघांचा मृत्यू झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
गडचिरोलीतही भीषण अपघात -
भीषण अपघाताची आणखी एक घटना गडचिरोलीमधूनही समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. यात एका हायवे ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर हे वाहन बोलेरो कँपर वाहनावर आदळलं. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.