Accident News: धावत्या ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् तिघांचा क्षणात शेवट, गडचिरोलीतील घटना
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
लोह खनिजाचं उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर नेलं जातं. रविवारी संध्याकाळी एका हायवा ट्रकमध्ये हे लोहखनिज भरण्यात आलं
महेश तिवारी, गडचिरोली 07 ऑगस्ट : भीषण अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. यात एका हायवे ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर हे वाहन बोलेरो कँपर वाहनावर आदळलं. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.
एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे . या ठिकाणी लोह खनिजाचं उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर नेलं जातं. रविवारी संध्याकाळी एका हायवा ट्रकमध्ये हे लोहखनिज भरण्यात आलं. यानंतर हे ट्रक खाणीतून खाली उतरत होतं. त्यावेळी ट्रकचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक अनियंत्रित झाला.
advertisement
ट्रक खाली उभा असलेल्या बोलेरो कँपर वाहनावर जाऊन आदळला. या घटनेत त्या वाहनात बसून असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात होताच जखमींना हेडरीच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून अहेरीच्या उपरुग्णालयात घेऊन जाईपर्यंतच यातील तिघांचा मृत्यू झाला. जखमींपैकी एकाला किरकोळ मार लागला असून एका जखमीला चंद्रपूरला उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
advertisement
या अपघातात ट्रकचा आणि बोलेरो वाहनाचा चालक मात्र बचावले आहेत. मात्र इतर तिघांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान ट्रकच्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
August 07, 2023 7:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Accident News: धावत्या ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् तिघांचा क्षणात शेवट, गडचिरोलीतील घटना