Sattu drink : उन्हाळ्यात प्रोटीनसाठी सत्तूचं सरबत पिता? डाएटिशियनने सांगितली पिण्याची योग्य पद्धत..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Right way to drink sattu Protein shake : सत्तू शरीराला प्रथिने देण्यासोबतच शरीराला ऊर्जाही देते. सत्तू पोटाला थंड ठेवते. हे प्यायल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. या सर्व फायद्यांसाठी उन्हाळ्यात सत्तूचं सरबत पिणं खूप फायदेशीर मानलं जातं.
मुंबई : सत्तूचे सरबत फुटाणे म्हणजेच भाजलेल्या चण्यापासून बनवले जाते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते. बरेच जिम करणारे लोक सत्तूचे सरबत किंवा सत्तूचे शेक बनवून पितात, जेनेकरून त्यांची त्या दिवसाची प्रोटीनची गरज पूर्ण होईल. पण तुम्हाला माहितीये का? हेच सत्तूचं सरबत योग्य पद्धतीनं न प्यायल्यास तुमच्या शरीरात समस्या निर्माण होऊ शकतात.
सत्तू शरीराला प्रथिने देण्यासोबतच शरीराला ऊर्जाही देते. सत्तू पोटाला थंड ठेवते. हे प्यायल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. या सर्व फायद्यांसाठी उन्हाळ्यात सत्तूचं सरबत पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र योग्य पद्धतीनं सत्तूचं सेवन न केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
डायटिशियन सोनिया नारंग यांनी सांगितले की, व्हे प्रोटीनच्या एका स्कूपमधून तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते, तर 100 ग्रॅम सत्तू पावडरमधूनही तुम्हाला तितकेच प्रोटीन मिळते. मात्र व्हे प्रोटीनमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ते सहज शरीरात शोषलं जातं आणि पचतंही. याउलट सत्तूमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरात शोषलं जाण्यास वेळ लागतो. यामुळे पचण्यासही वेळ लागतो.
advertisement
सत्तूचं सरबत पिण्याची योग्य पद्धत कोणती?
तुम्हाला व्हे प्रोटीनच्या एका स्कूपइतकेच प्रोटीन पाहिजे असेल तर त्यासाठी सत्तू ड्रिंक घेताना ते एकाचवेळी पिऊ नका. कारण जर तुम्ही एकाच वेळी जास्त प्रमाणात सत्तूचं सरबत घेतलं, तर त्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. त्यामध्ये असलेल्या हाय फायबरमुळे पोटात जडपणा किंवा गॅस होऊ शकतो.
एकावेळी तुम्हाला जितकं सत्तूचं सरबत प्यायचं असेल ते दिवसभरात घोट घोट करू प्या. यामुळे ते शरीरात पचायला पुरेसा वेळ मिळतो. यापद्धतीनं तुमची प्रोटीनची गरजही पूर्ण होते आणि तुम्हाला कसलाच त्रासही होत नाही.
advertisement
advertisement
म्हणूनच प्रोटीनसाठी असो की पोषण आणि थंडाव्यासाठी, उन्हाळ्यात सत्तू सरबत नक्की प्या. पण ते पिताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या. म्हणजे तुमच्या शरीराला याचे फायदे जास्त मिळतिल आणि काही दुष्परिणामही होणार नाहीत.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 4:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sattu drink : उन्हाळ्यात प्रोटीनसाठी सत्तूचं सरबत पिता? डाएटिशियनने सांगितली पिण्याची योग्य पद्धत..






