TRENDING:

Ahmedabad Air India Plane Crash: मोठी बातमी! एअर इंडिया विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 133 जण ठार

Last Updated:

Ahmedabad Air India Plane Crash: विमान अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये आज भीषण विमान अपघात झाला. लंडन जाणारे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेताच अवघ्या 10 मिनिटातच विमान कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. विमान अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 133 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Ahmedabad Air India Plane Crash
Ahmedabad Air India Plane Crash
advertisement

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाचा मागील भाग हा जवळील इमारतीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले, ज्यामुळे हा अपघात झाला. विमानात 242 लोक होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे हे विमान लंडनला रवाना झाले होते. मात्र, काही मिनिटांतच विमान कोसळले. या भीषण अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. अमित शहा यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.

advertisement

अपघातस्थळी धुराचे लोट स्पष्टपणे दिसून आले. विमान अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि इतर यंत्रणा तात्काळी घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्यातून बाधितांना बाहेर काढून त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच, संपूर्ण कर्मचारी सक्रिय झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्याच वेळी, अपघातस्थळी गोंधळाचे वातावरण होते.

advertisement

133 प्रवाशांचा मृत्यू....

या भीषण अपघाताची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरुवातीला जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील काही प्रवाशांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 133 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

विमान अपघाताची माहिती

12 जून 2025 रोजी, मेसर्स एअर इंडियाचे B787 विमान व्हीटी-एएनबी (अहमदाबाद ते गॅटविक) अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे 8200 तासांचा अनुभव असलेले एलटीसी आहेत. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. एटीसीनुसार, विमानाने अहमदाबाद येथील धावपट्टी 23 वरून भारतीय वेळेनुसार दुपारी 13.39 वाजता (0809 UTC) उड्डाण केले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल केला, परंतु एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

advertisement

इतर संबंधित बातमी:

Ahmedabad Air India Plane Crash: 242 प्रवासी, धुराचे लोळ...उड्डाण घेताच एअर इंडियाचे विमान का कोसळलं? समोर आलं कारण

मराठी बातम्या/देश/
Ahmedabad Air India Plane Crash: मोठी बातमी! एअर इंडिया विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 133 जण ठार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल