अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. अपघातस्थळी धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. विमान अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी पोहोचले आणि ढिगाऱ्यातून बाधितांना बाहेर काढून त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच, संपूर्ण कर्मचारी सक्रिय झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्याच वेळी, अपघातस्थळी गोंधळाचे वातावरण होते.
advertisement
विमानाचा अपघात का झाला?
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाचा मागील भाग हा जवळील इमारतीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले, ज्यामुळे हा अपघात झाला. विमानात 242 लोक होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे हे विमान लंडनला रवाना झाले होते. अपघातस्थळी धुराचे लोळ दिसून आले. अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. अमित शहा यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.
विमान अपघाताची माहिती
12 जून 2025 रोजी, मेसर्स एअर इंडियाचे B787 विमान व्हीटी-एएनबी (अहमदाबाद ते गॅटविक) अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे 8200 तासांचा अनुभव असलेले एलटीसी आहेत. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. एटीसीनुसार, विमानाने अहमदाबाद येथील धावपट्टी 23 वरून भारतीय वेळेनुसार दुपारी 13.39 वाजता (0809 UTC) उड्डाण केले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल केला, परंतु एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.