AI 171 विमान 12 जून रोजी अहमदाबादच्या गांधीनगर विमानतळाजवळ टेकऑफ करताना दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं आहे. नेमकं चाललंय काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये विमानात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
advertisement
अहमदाबाद-मुंबईनंतर नागपुरात विमानातं इमर्जन्सी लॅण्डिंग, धक्कादायक कारण समोर
AI 171 विमानाचं एअर इंडियाने नाव बदलून 159 केलं होतं. आज हे विमान अहमदाबादहून लंडनसाठी टेकऑफ करणार होतं. मात्र त्याआधीच तांत्रिक बिघाड आल्याने विमान रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी सकाळी अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानात देखील तांत्रिक बिघाड झाला होता. हे विमान 30-45 मिनिटं अहमदाबाद इथे थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हे विमान मुंबईला रवाना झालं होतं.