शुभ मोदी (24 वर्ष) आणि शगुन मोदी (22 वर्ष) हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक पिंकू मोदी यांची मुलं आहेत. शुभ आणि शगुन यांनी एमबीए पूर्ण केलं होतं, तसंच ते वडिलांना व्यवसायात मदत करत होते. शुभ आणि शगुन हे दोघेही लंडनला फिरायला निघाले होते. लंडनमध्ये जाऊन एका मित्रासोबत राहण्याचा प्लान या दोघांनी केला होता, पण त्यांचा हा प्लान पूर्ण व्हायच्या आधीच सगळं उद्ध्वस्त झालं. दरम्यान विमान अपघाताची माहिती मिळताच पिंकू मोदी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह अहमदाबादला रवाना झालं आहे.
advertisement
मेनारिया कुटुंबातील सदस्यही विमानात
उदयपूर जिल्ह्यातील रुंदेडा गावातील रहिवासी असलेले वरदी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया हे देखील त्याच विमानात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लंडनमध्ये शेफ म्हणून काम करतात. हे दोघेही लंडनला कामासाठी परत जात होते.
अपघाताच सर्व 242 जणांचा मृत्यू
गुरूवारी दुपारी 1.38 वाजण्याच्या सुमारास या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ केलं, पण पुढच्या 10 मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं. या विमानात क्रू सह 242 जण होते, या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.