टेक ऑफ घेताच कोसळलं विमान...
विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपासानुसार, विमानाने उड्डाण करताच त्याचे मुख्य इंजिन निकामी झाले. यामुळे, विमान पुरेशी उंची गाठू शकले नाही. तसेच पायलट 'आपत्कालीन वळण' घेण्याचा किंवा सुरक्षितपणे परतण्याचा कोणताही प्रयत्न करू शकला नाही. 625 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर विमान थेट खाली कोसळले. बोईंग 787 मध्ये राम एअर टर्बाइन (RAT) नावाची बॅकअप सिस्टम आहे, जी अशा परिस्थितीत काही महत्त्वाच्या सिस्टीमना वीज पुरवते. परंतु जेव्हा विमान जास्त उंचीवर पोहोचते तेव्हाच ते काम करते.
advertisement
ब्लॅक बॉक्स मिळाले, पण विश्लेषण बाकी...
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी पुष्टी केली आहे की फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सापडले आहेत आणि ते आता एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे सुरक्षित आहेत. तपास संस्थेने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत आणि आता डेटाचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पायलटची चूक नाही, विमानात झाला बिघाड...
The Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, प्राथमिक तपासानुसार, वैमानिकाने परिस्थिती हाताळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याने मॅन्युअल कंट्रोल सिस्टमने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप कमी उंचीमुळे त्याच्याकडे वेळ आणि जागा दोन्ही नव्हते. जर विमान किमान 3600 फूट उंचीवर पोहोचले असते, तर RAT सिस्टम सक्रिय करता आली असती आणि कदाचित विमान मागे वळवता आले असते. परंतु या उंचीवर पोहोचण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाल्याने विमान थेट कोसळले.
इंधनात पाणी? सगळ्या अँगलने होतेय तपासणी....
या अपघाताची चौकशी करणारे अधिकारी हे इंधनात, विशेषतः पाण्यात काही अशुद्धता होती का? इंधनात पाणी असणे ही एक ज्ञात समस्या आहे. ज्यामुळे उड्डाणादरम्यान विद्युत प्रणाली बिघाड किंवा इंजिन बंद पडणे यासारख्या घटना घडू शकतात. जर यांत्रिक किंवा विद्युत बिघाडाचे कोणतेही थेट कारण आढळले नाही, तर इंधन भेसळीचा हा सिद्धांत प्रबळ मानला जाईल. अपघातापूर्वीच्या 24 ते 48 तासांच्या उड्डाणांची तांत्रिक माहिती, लॉग बुक आणि ग्राउंड स्टाफ रिपोर्ट तपासले जात आहेत.
गॅटविक सारखीच गोष्ट, 2020 मधील प्रकरण...
तपास अधिकारी या अपघाताची तुलना 2020 मध्ये लंडनच्या गॅटविक विमानतळावर घडलेल्या घटनेशी करत आहेत. तिथे एअरबस A321 च्या दोन्ही इंजिनांनी टेकऑफनंतर काम करणे थांबवले होते. परंतु विमान 3580 फूट उंचीवर पोहोचले होते. त्यामुळे ते तीन वेळा May Day कॉल करून परत येऊ शकले. त्या घटनेतही इंधन प्रणालीतील पाण्याची अशुद्धता हे कारण आढळून आले होते.