TRENDING:

महिनाभर सुरू असलेलं ऑपरेशन यशस्वी, पहलगामच्या मारेकऱ्यांचा खात्मा कसा केला? शाहांनी सगळं सांगितलं

Last Updated:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन महादेव' यशस्वी झाल्याची घोषणा केली. पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सुलेमान हा लष्कर ए तोएबाचा कमांडर होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा खुलासा केला. 'ऑपरेशन महादेव' यशस्वीपणे पार पडलं असून, या कारवाईत पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, असं शाह यांनी सांगितलं. या तिघांपैकी एक लष्कर ए तोएबाचा कमांडर होता, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू-कश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी मिळून ही मोहीम राबवली.
Amit Shah On Operation Mahadev
Amit Shah On Operation Mahadev
advertisement

ऑपरेशन महादेवची महत्त्वपूर्ण माहिती अमित शाह यांनी दिली

सुलेमान उर्फ फैजल, अफगान, जिबरान या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीर, श्रीनगर पोलीस, जवान यांची संयुक्त कारवाई करण्यात आली. सुलेमान हा लष्कर ए तोएबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ल्यात आणि गगनगीर दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात असल्याचे पुरावे आमच्या हाती आले आहेत. अफगाण आणि जिबरान A ग्रेड दहशतवादी असल्याची असल्याची माहिती दिली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ऑपरेशन महादेव यशस्वी करुन पहलगामचा बदला घेतला पूर्ण झाला.

advertisement

सेनेची पॅराफोर्स, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांचे विशेष आभार आणि शुभेच्छा देत आहे. त्यांची कामगिरी मोलाची ठरली. ऑपरेशन महादेवची सुरुवात 22 एप्रिल रोजी रात्री गुप्त बैठक झाली. ही जम्मू काश्मीरमध्ये ही बैठक झाली होती. दहशतवादी पाकिस्तानमध्ये पळून जाऊ नयेत यासाठी काय योजना तयार करायची यावर बैठक झाली.

Operation Sindoor : चिदंबरम यांच्या प्रश्नाला अमित शहांचं लोकसभेत उत्तर, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, म्हणाले...

advertisement

22 मे रोजी आयबीकडे एक महत्त्वाचा पुरावा आला. गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. मे ते 22 जुलै एक सिग्नल कॅप्चर करण्यासाठी जवान, सीआरपीएफ प्रयत्न करत होते. सेन्सरच्या मदतीनं 22 जुलै रोजी दहशतवादी या गावात लपून बसल्याची माहिती कन्फर्म झाली. त्यानंतर 4 पॅरा जवान, सीआरपीएफचे जवान, पोलीस यांनी दहशतवाद्यांना घेरण्याचं काम केलं. त्यानंतर 28 जुलै रोजी हे ऑपरेशन पूर्ण झालं.

advertisement

दहशतवाद्यांना अन्नपुरवठा करणाऱ्यांना NIA ने आधीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणले गेले. त्यानंतर चार लोकांकडून हेच पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी होते का याची पुष्टी करून घेण्यात आली. आम्ही त्याच्यावरही पटकन विश्वास ठेवला नाही. आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील काडतूसांचा रिपोर्ट होताच.

या तीन दहशतवाद्यांकडे मिळालेल्या रायफल्सची काडतूसं आधीच्या काडतुसांना मॅच होतात की नाही ते तपासून पाहायचे होते. AK 47 आणि अमेरिकन रायफल होती. ती पडताळून पाहिली आणि त्यावरही आम्ही पूर्ण समाधानी नव्हतो. आम्ही आणखी तपासण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांकडे मिळालेल्या रायफल आम्ही विशेष विमानाने चंदीगडला पाठवल्या, पूर्ण रात्रभर फायरिंग करून आम्ही त्याची तपासणी केली. यामध्ये फायरिंगमुळे झालेले खोक्यांवरचे छेद तपासण्यात आले आणि त्यातून कन्फर्म करण्यात आलं.

advertisement

बॅलेस्टिक रिपोर्ट माझ्या हातात आहेत. 6 वैज्ञानिकांनी क्रॉस चेक केला आहे. सकाळी 4 वाजून 46 मिनिटांनी मला फोन आला. त्यांनी व्हिडीओ कॉल करुन सांगितलं की 100 टक्के त्याच गोळ्या आहेत ज्यातून या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा जीव घेतला. हे आपल्या सैन्य दलाचं, जम्मू काश्मीर पोलिसांचं सर्वात मोठं यश आहे. पंतप्रधान नरेंद्र ऑपरेशन सिंदूर करुन ज्यांनी दहशतवाद्यांना पाठवलं त्यांनाही ठोकलं आणि दहशतवाद्यांचाही खात्मा केला.

मराठी बातम्या/देश/
महिनाभर सुरू असलेलं ऑपरेशन यशस्वी, पहलगामच्या मारेकऱ्यांचा खात्मा कसा केला? शाहांनी सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल