Operation Sindoor : चिदंबरम यांच्या प्रश्नाला अमित शहांचं लोकसभेत उत्तर, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, म्हणाले...

Last Updated:

Amit Shah Answer to P Chidambaram : काल माजी गृहमंत्री चिदंबरमजींनी प्रश्न उपस्थित केला होता. दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय आहे? मी त्यांना विचारू इच्छितो की पाकिस्तानला वाचवून त्यांना काय मिळेल, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

Home Minister Amit Shah Answer to P Chidambaram
Home Minister Amit Shah Answer to P Chidambaram
Amit Shah Answer On Operation Sindoor : दहशतवादी पाकिस्तानमधील होते की भारतातच तयार केले गेले होते? प्रुफ आहे का? असा सवाल काल लोकसभेत चिदंबरम यांनी विचारला होता. त्यावर आज गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं. चिंदंबरम पाकिस्तानची बाजू का घेत आहेत? असा खडा सवाल अमित शहा यांनी केला. दहशतवादी पाकिस्तानमधूनच आले होते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या रायफल आणि एके 47 पाकिस्तानमधील होते. त्यांच्याकडे सापडलेले चॉकटेल देखील पाकिस्तानमधील होते, असं अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं.

अमित शहा यांची काँग्रेसवर टीका

काल माजी गृहमंत्री चिदंबरमजींनी प्रश्न उपस्थित केला होता. दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय आहे? मी त्यांना विचारू इच्छितो की पाकिस्तानला वाचवून त्यांना काय मिळेल. जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा याचा अर्थ ते पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
advertisement
advertisement

पाकिस्तानचा बुरखा फाडला

एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच अटक केली होती. त्यांना जेवू घालणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरमध्ये पोहोचले तेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे ते तिघे जण असल्याचे त्यांना आढळले. दहशतवादी हल्ल्यातील काडतुसेचा एफएसएल अहवाल आधीच तयार होता. काल, तिन्ही दहशतवाद्यांच्या रायफल जप्त करण्यात आल्या आणि एफएसएल अहवालांशी जुळवण्यात आल्या. काल चंदीगडमध्ये पुढील चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर हे तिघंही दहशतवादी हल्ला करणारेच असल्याची पुष्टी झाली, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor : चिदंबरम यांच्या प्रश्नाला अमित शहांचं लोकसभेत उत्तर, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, म्हणाले...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement