अवकाळी पावसाने मक्याच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पावसामुळं शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक तर आधीच हातातून गेले. पण, आता मका पिकाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. कारण मक्याचे उत्पादन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होईल असा अंदाज होता. मक्याचे दाणे बघून हा अंदाज खराही ठरला. पण, आता काढणीला आलेल्या मक्याचे पुन्हा एकदा काल 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळं नुकसान झाले आहे.
पावसामुळं शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक तर आधीच हातातून गेले. त्यानंतर शेतकऱ्यांची मका पिकाकडून अपेक्षा होती. कारण मक्याचे उत्पादन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होईल असा अंदाज होता. मक्याचे दाणे बघून हा अंदाज खराही ठरला. पण, आता काढणीला आलेल्या मक्याचे पुन्हा एकदा काल (25 ऑक्टोबर) झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापलेला मका शेतात पडलेला होता. तो आता वादळी पावसामुळं निकामी झाला आहे.
जमीन ओली असल्याने मक्याच्या दाण्याला कोंब फुटण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांसाठी तयार झालेला कडबा देखील हातून गेलाय. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसामुळं हिरावला गेला आहे. अमरावती जिल्ह्यांतील अंजनगाव बारी परिसरात 25 ऑक्टोबर रोजी चांगला पाऊस झालाय. त्यामुळे मका पिकाचे नुकसान झाले आहे. अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मका पीक हे आता काढणीला आले होते. मक्याची कापणी सुरू होती. अशातच अचानक आलेल्या पावसामुळं मका पिकाचे नुकसान झाले आहे.
advertisement
शेतात कापलेला मका पडलेला होता. तो पूर्णतः ओला झाल्याने आता निकामी झालेला आहे. सुकलेल्या मक्याचा वापर आम्ही कडबा म्हणून करत असतो. जनावरांना त्याचा चारा म्हणून वर्षभर साठवून ठेवतो. पण, यावर्षी पावसामुळं. तो मका पूर्ण सडणार आहे. त्यामुळे जनावरांना चाऱ्याची टंचाई देखील होवू शकते. मका कापणी झाल्यानंतर मशीनने डायरेक्ट काढणी करण्याचा विचार झाला होता. तसे नियोजनही झाले. पण, आता पावसामुळं त्या नियोजनाचा खोळंबा झाला आहे. पावसामुळं आधीच नुकसान झालेलं आहे. राहलेला मका जर शेतात ठेवला आणि पाऊस झाला तर पूर्णतः मका उध्वस्त होईल, याभितीने आता मक्याचे कणीस तोडून ते सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू झाले आहे.
advertisement
आता शेतकऱ्याला दुहेरी खर्च करावा लागत आहे. आधीच पावसामुळं नुकसान आणि त्यात दुहेरी खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. सोयाबीन पिकाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी मका पिकाची लागवड करतात. कारण मक्याचे उत्पादनही चांगले मिळते आणि दरही चांगला मिळतो. यावर्षी सुद्धा मका पीक शेतकऱ्याची साथ देईल, अशी आशा होती. कारण एका मक्याच्या कणीसमध्ये 600 ते 650 दाणे बघायला मिळाले. पण, आता पावसामुळं पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. कारण कितीही म्हटलं तरी पाणी लागलेला मका मार्केटमध्ये कमी दरात जाण्याची शक्यता आहे. तसेच नुकसानही झाले आहे. दुहेरी खर्चही होत आहे, त्यामुळे आता शेतकरी आता आणखी चिंतेत आहे, अशी माहिती शेतकरी रविंद्र मेटकर यांनी दिली.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 26, 2025 6:59 PM IST

