नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तसे संकेत दिले. राज्य सरकार मोठ्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊ शकते.आंध्रमध्ये, 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना पंचायत आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्यापासून रोखण्यासाठी कायद्यात आधीच सुधारणा करण्यात आली आहे.
मोठ्या कुटुंबांना सरकार आर्थिक मदत देईल: मुख्यमंत्री नायडू
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले, कुटुंबाला एक युनिट मानून आमचं सरकार आर्थिक मदत देण्याचा विचार करत आहे. मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देता येईल. त्याच वेळी, त्यांनी शून्य गरिबी उपक्रमाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की आंध्र प्रदेशातील प्रजनन दर वाढवावा लागेल. सध्याच्या प्रजनन दरामुळे राज्यात भविष्यात अनेक समस्या उद्भवतील.
advertisement
अलीकडेच चंद्राबाबू यांनी महिलांच्या प्रसूती रजेबाबत घोषणा केली होती. महिला कर्मचारी त्यांना पाहिजे तितक्या वेळा प्रसूती रजा घेऊ शकतात, असे नायडू यांनी म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते की, जुन्या काळात दाम्पत्याला चार-पाच मुलं असायची. सध्यची पिढी फक्त एकाच मुलावर थांबली आहे. तर, काहीजण म्हणतात की आम्हाला मुलं नसल्याने नवरा-बायकोच्या उत्पन्नातून आणखी मौज करू, आता त्यांच्या आई-वडिलांनी असाच विचार केला असता तर ते या जगात आले असते का, असा सवालही चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.
दक्षिण कोरिया, जपान आणि इतर काही देशांचे उदाहरण देत त्यांनी म्हटले की, तेथील लोकांना घटत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामाची माहिती नाही. तेथील लोक फक्त पैसे कमावण्याच्या मागे असून देशाच्या प्रगतीवरच अधिक लक्ष केंद्रीत करतात, असेही त्यांनी म्हटले.