सध्या महाराष्ट्रात अशाच एका विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर, सुप्रसिद्ध ज्योतिषी अंकित त्यागी यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोक त्याचे संबंध या अपघाताशी जोडत आहेत. या व्हिडीओची ही लहान क्लिप 2 जानेवारीचा असल्याचं दिसतंय. तर मुख्य व्हिडीओ 2025 डिसेंबरमध्ये शुट केलं असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
'विमान पडणार, हे माहिती होतं, त्याने सांगितलही पण...' अजितदादांच्या प्लेन क्रॅशचा त्या पॉडकास्टशी काय संबंध?
27 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राने आपला एक धडाडीचा नेता गमावला. या घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात असतानाच, सोशल मीडियावर एका पॉडकास्टची क्लिप चर्चेचा विषय ठरली आहे. यामध्ये ज्योतिषी अंकित त्यागी यांनी विमान अपघाताबाबत दिलेला इशारा आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नेमकं काय होतं ते भाकित?
काही महिन्यांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना ज्योतिषी अंकित त्यागी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "मी तर अजूनही सांगतोय, फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान मोठा विमान अपघात होण्याची शक्यता आहे. जर कोणाला थांबवता आलं तर नक्की थांबवा." अंकित त्यागी पुढे म्हणतात की, "एक ज्योतिषी म्हणून माझं काम भीती पसरवणं नाही, तर ग्रहांची गणना करून येणाऱ्या संकटाचे संकेत देणं आणि लोकांना अलर्ट करणं आहे. मग ते नाडी ज्योतिष असो किंवा वैदिक, भविष्याचे संकेत देणं हाच खरा ज्योतिष धर्म आहे."
अजितदादांच्या अपघाताशी संबंध का जोडला जातोय?
जरी त्यागी यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्याचा उल्लेख केला असला, तरी जानेवारीच्या अखेरीस घडलेल्या या भीषण अपघातामुळे नेटकरी या भाकिताकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. 1. काळाचा ताळमेळ: जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीची सुरुवात यामध्ये केवळ काही दिवसांचे अंतर आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बदलतानाचा हा काळ संवेदनशील मानला जातो. 2. मोठा अपघात: त्यागी यांनी 'मोठ्या' अपघाताचा उल्लेख केला होता आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे विमान कोसळणे ही देशातील सर्वात मोठी आणि धक्कादायक घटना ठरली आहे.
अंकित त्यागी यांच्या व्हिडिओवर आता दोन प्रकारचे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही लोकांच्या मते ही केवळ एक योगायोग असू शकते, तर काही जण त्यांच्या गणितावर विश्वास व्यक्त करत आहेत. त्यागी यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की, ज्योतिषी फक्त संकेत देऊ शकतो, दुर्घटना थांबवणे हे त्याच्या हातात नसते.
अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. अंकित त्यागी यांच्या भाकिताचा आणि या अपघाताचा थेट संबंध लावणं हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विश्वासाचा भाग आहे. पण, अशा संकटांच्या काळात अफवांपेक्षा संयम आणि वस्तुस्थितीला अधिक महत्त्व देणं गरजेचं असतं.
