डॉक्टरांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे. महिलेचे कुटुंब आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमॉर्टम केले जात आहे. मृताच्या कुटुंबाने हत्येचा आरोप केला आहे. महिलेच्या गुप्तांगावर, खांद्यावर आणि चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत.
मध्य प्रदेशची राजधानी भोपालमधील मॉडेल खुशबू अहिरवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचे कुटुंबीय लाडाने तिला खुशी म्हणायचे. खुशबूच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खुशबूचा रविवारी रात्री 11 वाजता मृत्यू झाला. तिच्या मृत्यूवरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. खुशबूच्या आईने प्रियकर कासिम अहमदवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.
advertisement
डायमंड गर्ल नावाने सोशल मीडियावर फेमस
मॉडेल खुशबू अहिरवार सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. तिचे डायमंड गर्ल नावाचे इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्याचे १२,००० फॉलोअर्स आहेत. खुशबू वारंवार या अकाउंटवर मॉडेलिंग करतानाचे फोटो शेअर करत असते. उज्जैचा रहिवासी असलेल्या कासिम नामाच्या युवकासोबत ती लिव-इन- रिलेशनमध्ये राहत होती. खुशबूने तेरावीनंतर शिक्षण सोडले होते. तीन वर्षापासून ती भोपाळमध्ये राहत होती. भोपाळमध्ये अनेक स्थानिक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग देखील केले होते.
आईशी फोनवर काय बोलणे झाले?
मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने बॉयफ्रेंड कासीमवर गंभीर आरोप केले आहे. खुशबूची आई लक्ष्मी म्हणाली की, तीन दिवसांपूर्वी कासीमने तिला फोन केला होता. त्यावेळी त्याने तो मुस्लीम असल्याचे सत्य सांगितले. तुमची मुलगी माझ्यासोबत सुरक्षीत आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तिला घेऊन उज्जैनला जात आहे. त्यावेळी मुलगी देखील फोनवर बोलली होती. ती मला म्हणाली, आई तू काळजी करू नको... कासीम खूप चांगला आहे.
कुटुंबीयाचा बॉयफ्रेंडवर लव्ह जिहादचाही आरोप
कासीम खुशबूला हॉस्पिटलमध्ये सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. तो फरार देखील झाला, मात्रा सीसीटीव्हीमुळे तो पकडला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मॉडेल खुशबूच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबीयांनी खुशबूचा मृतदेह बघितला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर शरीरावर जखमा होत्या. तिचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची हत्या झाल्याचा कुटुंबीयाचा आरोप आहे. यावेळी लव्ह जिहादचाही आरोप बॉयफ्रेंडवर केला.
