दरम्यान, भारत आणि भूतानमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच 4033 कोटी इतक्या किंमतीच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्हीही देशातील संपर्क, व्यापार आणि पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला परदेशात जाण्यासाठी भारतीय पर्यटकांना विमानप्रवासाची गरज भासणार नाही. पश्चिम बंगालच्या हासमिरापर्यंत धावणारी भारतीय रेल्वे आता भूतानमधील गेलेफूपर्यंत धावणार आहे. यासाठी आसाम राज्यातल्या कोक्राझार ते भूतानमधल्या गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे.
advertisement
आसाममधील कोक्राझार ते भूतानच्या गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी भारतीय रेल्वेला 3456 कोटीचा खर्च येणार आहे. आणखी एक प्रकल्प भारतीय रेल्वे बांधणार आहे. तो म्हणजे पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत असणार आहे. 20 किलोमीटर लांबीचा हा दुसरा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी भारतीय रेल्वेला 577 कोटींचा खर्च येणार आहे. असा एकूण तब्बल 4033 कोटी इतका खर्च येणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गामुळे भारत आणि भूतान यांच्यातील संबंध आणखी मजबूत होताना दिसत आहेत. या रेल्वे मार्गांमुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि व्यापार आणखीनच दृढ होताना दिसत आहेत. शिवाय, पर्यटन वाढत असल्यामुळे दोन्हीही देशातल्या स्थानिकांच्या रोजगारामध्ये आणखीन भर पडणार आहे.