भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपणार आहे. यानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. याआधी भाजपने जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत वाढवला होता. आता निकालानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षामुळे महाराष्ट्र संघटनेतही मोठे फेरबदल होऊ शकतात.
Exit Poll म्हणजे काय रे भाऊ? आकडे येतात कुठून? जाणून घ्या 8 प्रश्नांची उत्तरं
advertisement
जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? याची चर्चा आता होत आहे. जेपी नड्डा यांच्याआधी अमित शहा आणि नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाल्यास महाराष्ट्र संघटनेतही बदल होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणारे बदलही महत्त्वाचे ठरणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला होता. जेपी नड्डा हे २०१९ मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे २०२० मध्ये हातात घेतली. तेव्हापासून जेपी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
