TRENDING:

OYO : माजी नगरसेविकेसोबत पतीला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं, पत्नीचा OYO मध्ये राडा

Last Updated:

OYO : ओयो हॉटेलमध्ये एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. हॉटेलच्या रुममध्ये आपल्या पतीला एका परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने तुफान राडा केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
OYO Hotel New: ओयो हॉटेलमध्ये एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. हॉटेलच्या रुममध्ये आपल्या पतीला एका परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने तुफान राडा केला. पतीने दिलेल्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने नवऱ्याला चांगलंच फटकवलं. ओयोमध्ये घडलेल्या या राड्याचा व्हिडीओ सध्या स्थानिक पातळीवर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा पतीदेखील नगरसेवक होता. तर, त्याची कथित प्रेमिका असलेली माजी नगरसेविका ही महिलांच्या प्रश्नासाठी स्थापन केलेल्या SHE पथकाची प्रमुख होती.
News18
News18
advertisement

तेलंगणातील महबूबाबाद शहरात काल एका OYO हॉटेलमध्ये झालेल्या कौटुंबिक ‘हायवोल्टेज ड्राम्याने’ केवळ सोशल मीडियाच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाला हादरवून टाकलं आहे. बीआरएस (BRS) पक्षाचे माजी नगरसेवक गोगुला राजू हे आपल्या महिला मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती त्यांच्या पत्नीला आधीच मिळाली होती. आणि त्यानंतर तिने स्वतः आपल्या काही कार्यकर्त्यांसह धडक देत पतीला रंगेहात पकडले.

advertisement

गोगुला राजू आणि संबंधित महिला – जी स्वतःदेखील माजी नगरसेविका असून, कधी काळी ‘शी टीम’ (महिलांच्या सुरक्षेसाठी गठित विशेष पथक) ची सदस्य होती. या दोघांमधील कथित प्रेमसंबंधाची कुणकुण पत्नी अनुराधा यांना काही महिन्यांपासून होती. त्यांनी सुरुवातीला पतीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजू याने ऐकले नाही. त्यामुळे अनुराधा यांनी आपला संसार वाचवण्यासाठी थेट 'सर्जिकल स्ट्राइक' केला.

advertisement

काल गोगुला राजू आपल्या कथित प्रेयसीसोबत महबूबाबादमधील एका OYO हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच वेळी अनुराधा आपल्या काही नातेवाईक व समर्थकांसह तिथे पोहोचल्या. त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना रूम उघडायला लावली, कॅमेरे ऑन केले आणि थेट दरवाज्यापाशी गोंधळ घातला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला. हॉटेल रूममध्ये घुसून अनुराधा यांनी पतीला कानशिलात लगावली. “माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस?” असा जाबही त्यांनी विचारला. काही स्थानिक कार्यकर्त्यांनीही या गोंधळात सहभाग घेतला. त्यातील काहींनी माजी नगरसेवकावर आपला हात साफ करून घेत प्रसाद दिला.

advertisement

त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी राजू आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बीआरएस पक्षात अंतर्गत खळबळ उडाली आहे. पक्षाचे काही नेते या प्रकारावर खुली टीका करत असून, राजू यांच्यावर पक्षस्तरावरही शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे एकेकाळी महिलांच्या सुरक्षेचे धडे देणाऱ्या माजी नगरसेविकेचीही प्रतिमा मलीन झाली आहे. संपूर्ण घटनेमुळे महबूबाबाद शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
OYO : माजी नगरसेविकेसोबत पतीला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं, पत्नीचा OYO मध्ये राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल