नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी ६.५५ वाजता एका कारमध्ये स्फोट झाला. ही कार हुंदाई i-20 कार होती. या कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा या कारच नंबर HR26 हा हरियाणा पासिंगचा असल्याचं समोर आलंय. ही कार गुरग्राम इथं राहणाऱ्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद सलमानने ही कार ओखलामध्ये दीड वर्षांपूर्वी देवेंद्र नावाच्या व्यक्तीला व्यक्तीला विकली होती. सलमानने कारशी संबंधी सगळे कागदपत्र हे पोलिसांना दिले आहे.
advertisement
देवेंद्रने हरियाणामध्ये विकली कार
आता पोलीस देवेंद्र नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासामध्ये देवेंद्र नावाच्या या व्यक्तीने हरियाणा येथील अंबाला परिसरात एका व्यक्तीला कार विकली होती. सध्या अंबाला पोलीस कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. ज्यावेळी दिल्लीत स्फोट झाला तेव्हा कार कुणाकडे होती, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
गुरुग्राम पोलिसांनी आता सगळी माहिती गोळा केला आहे. ही माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल, एनआयए आणि एनएसजी ची संयुक्तपणे तपास करत आहे. ही कार कुठून कुठे गेली, कोणत्या टोलनाक्यावर गेली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ही कार स्फोट होण्याआधी कुठून कुठे गेली हे तपासलं जात आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी ही कार विकण्यात आली होती. या दीड वर्षांमध्ये ही कार अनेक लोकांच्या हातात गेली. आता पोलीस याचा शोध घेत आहे स्फोटाच्या काही तास आधी ओखला आणि चांदनी चौक मार्गावर ही कार कशी पोहोचली. कारमध्ये स्फोटक आधीपासून होती की, कुणी ठेवली, याचा शोध घेतला जात आहे.
कारमध्ये ४ जण होते?
तपास यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, हुंदाई i-20 कारमध्ये हा स्फोट झाला. ही कार हरियाणा पासिंगची असून मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तिवर रजिस्टर आहे. सलमानने ती कार पुढे ओखला मध्ये एका व्यक्तीला विकली होती. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, तेव्हा कार ही लाल किल्ला परिसरात पोहोचत होती. धावत्या कारमध्ये हा स्फोट झाला. कारमध्ये ४ जण प्रवास करत होते, यात चारही जणांचा मृत्यू झाला. आता पोलीस या मोहम्मद सलमानने ज्या व्यक्तीला कार विकली त्याचा शोध घेत आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता, त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
