मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी ६.५५ वाजता एका कारमध्ये स्फोट झाला. ही कार हुंदाई i-20 कार होती. या कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, कारच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या कार, खासगी वाहनं आणि दुचाकींचा चक्काचूर झाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा या कारच नंबर HR26 हा हरियाणा पासिंगचा असल्याचं समोर आलंय. ही कार गुरग्राम इथं राहणाऱ्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद सलमानने ही कार ओखलामध्ये एका व्यक्तीला विकली होती. मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे.
advertisement
कारमध्ये ४ जण होते?
तपास यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, हुंदाई i-20 कारमध्ये हा स्फोट झाला. ही कार हरियाणा पासिंगची असून मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तिवर रजिस्टर आहे. सलमानने ती कार पुढे ओखला मध्ये एका व्यक्तीला विकली होती. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, तेव्हा कार ही लाल किल्ला परिसरात पोहोचत होती. धावत्या कारमध्ये हा स्फोट झाला. कारमध्ये ४ जण प्रवास करत होते, यात चारही जणांचा मृत्यू झाला. आता पोलीस या मोहम्मद सलमानने ज्या व्यक्तीला कार विकली त्याचा शोध घेत आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता, त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमित शाहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस
दरम्यान, दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शाह तातडीने दिल्लीत दाखल झाले. त्यांनी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. गृहमंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, तपास यंत्रणांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी स्फोटात मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
