TRENDING:

Air Indiaचे आणखी एक Emergency Landing, विमान 1 तास हवेत फिरले; प्रवाशांची फ्लाइटमधून थरारक सुटका

Last Updated:

Air India Emergency Landing: दिल्लीहून व्हिएतनामला जाणारी एअर इंडियाची AI 388 फ्लाइट उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात तांत्रिक बिघाडामुळे परत दिल्ली विमानतळावर आणावी लागली. या घटनेमुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: प्रवाशांचे प्राण पुन्हा एकदा थोडक्यात वाचले. दिल्लीहून व्हिएतनामला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI 388 ने जसे उड्डाण घेतले त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत तांत्रिक बिघाडामुळे विमान परत बोलावण्यात आली. विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेनंतर एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
News18
News18
advertisement

AI 388 फ्लाइट दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण केल्यानंतर बऱ्याच वेळपर्यंत दिल्लीच्या रेडियसमध्येच फिरत होती. मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाने पुढील उड्डाण रद्द करून विमान परत दिल्ली विमानतळावर उतरवले. पण आजच्या घटनेमुळे एक प्रश्न निश्चितपणे समोर आला तो म्हणजे फक्त ब्रँडवर विश्वास बसतो का? कारण हे विमान एअरबस कंपनीचे होते. ही तीच युरोपियन कंपनी आहे, जिच्या विमानांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जाते.

advertisement

एकामागून एक हादरे

या घटनेच्या काही दिवस आधीच एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात करण्याची घोषणा केली होती. कारण? अहमदाबाद घटनेत सामील फ्लाइट AI 171, जी Boeing 787-8 Dreamliner होती. त्या घटनेनंतर एअर इंडियाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच संकटाचे ढग जमले. आता Airbus मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे नव्याने भीती निर्माण झाली आहे. प्रश्न असा की, एअर इंडियाची सुरक्षा प्रणाली कमकुवत होत चालली आहे का?

advertisement

66 फ्लाइट्स रद्द – आता ही नवी घटना…

Boeing Dreamliner च्या 66 उड्डाणांना आधीच रद्द करण्यात आले आहे. ही विमाने दीर्घ पल्ल्याच्या मार्गांवर नेमण्यात येत होती. आता Airbus मध्येही अडचणी समोर येत आहेत. त्यामुळे काही गंभीर प्रश्न उभे राहतात-

एअर इंडिया आपली तांत्रिक तपासणी वेळेवर करते का?

पायलट्स आणि क्रू मेंबर्सना योग्य ती आगाऊ सूचना दिली जाते का?

advertisement

आणि सर्वात महत्त्वाचे – प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जातेय का?

प्रवाशांचा संताप

एअर इंडियाने सांगितले आहे की, त्यांनी प्रवाशांना परतावा किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नवीन बुकिंगचा पर्याय दिला आहे. मात्र सोशल मीडियावर आणि प्रवाशांच्या प्रतिक्रियांमधून तीव्र नाराजी स्पष्टपणे दिसून येते आहे.

मराठी बातम्या/देश/
Air Indiaचे आणखी एक Emergency Landing, विमान 1 तास हवेत फिरले; प्रवाशांची फ्लाइटमधून थरारक सुटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल