TRENDING:

देशी फटाका गनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, 188 जणांच्या जीवावर बेतली, का ठरतेय जीवघेणी?

Last Updated:

देशी फटाका गनमुळे भोपाळसह मध्य प्रदेशात १८८ जणांच्या डोळ्यांना इजा झाली असून, गांधी मेडिकल कॉलेजमध्ये ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सावधगिरीचे आवाहन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फटाक्यांचा धूर आणि फटाके शरीरासाठी अत्यंत हानिकारक, त्यात ते दिवसेंदिवस महाग होत चालल्याने खिशाला परवडत नाहीत. मग अशावेळी जुगाड करुन सहज उपलब्ध होणारी आणि खिशाला परवडणारी देशी फटाका गन मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. मात्र या फटाका गननं 188 जणांना इजा पोहोचवली आहे. ही गन सध्या जेवढी चर्चेत आहे तेवढीच ती जीवघेणी देखील ठरत असल्याचं समोर आलं आहे.
News18
News18
advertisement

दिवाळीच्या दिवसांत बाजारात सहज उपलब्ध होणारी आणि स्वस्त असलेली देशी कार्बाइड गन अत्यंत धोकादायक ठरत आहे. फटाक्याच्या आवाजासाठी वापरल्या जाणाऱ्या या रासायनिक उपकरणांमुळे मध्य प्रदेशात आणि इतर राज्यांत गंभीर घटना घडल्या असून, आतापर्यंत तब्बल १८८ लोकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेत भोपाळ शहरातील सर्वात जास्त मुलांचा समावेश आहे आहेत.

advertisement

भोपाळमध्ये १५० हून अधिक लोकांच्या डोळ्यांना या फटाका गनमुळे इजा झाली. यापैकी बहुतांश पीडित ७ ते १४ वर्षे वयोगटातील लहान मुले आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत ग्वाल्हेरमध्येही एकाच दिवसात १९ व्यक्ती जखमी झाल्या. याव्यतिरिक्त, इंदूरमध्ये ३, विदिशामध्ये १२ आणि इतर ३ ठिकाणी घटना समोर आल्या आहेत. ही गन चालवताना डोळे भाजल्याच्या घटना घडल्या आहेत.

advertisement

भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजच्या नेत्र विभागात सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५ मुलांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. हे इतकं घातक केमिकल असतं की त्यामुळे डोळे कायमचे जाण्याचा धोका असतो, हे प्रकरणं समोर असताना देखील अशा प्रकारच्या गन बाजारात उपलब्ध आहे हे धोकादायक आहे.

बाजारात केवळ १०० ते २०० रुपयांत मिळणारी ही गन आता मुलांमध्ये एक धोकादायक ट्रेंड बनली आहे. या गनमध्ये भरलेले कॅल्शियम कार्बाइड पाण्याच्या संपर्कात येताच एसिटिलीन गॅस तयार करतो. हा वायू स्फोटासह जळतो आणि काही सेकंदात डोळे, त्वचा आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होते. भाजल्यासारखं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

जेव्हा ही गन चालत नाही, तेव्हा मुले उत्सुकतेने तिच्या नळीमध्ये डोकावून पाहतात. त्याचवेळी गॅसचा दाब वाढतो आणि मोठा स्फोट होतो. हे उपकरण फटाका गन नाही तर नसून एक रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारं उपकरण आहे, जे एका क्षणात लहान मुलांची डोळ्यांची दृष्टी घालवू शकतं. त्यामुळे अशा खेळण्यांपासून मुलांना दूर ठेवणं गरजेचं आहे असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

मराठी बातम्या/देश/
देशी फटाका गनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, 188 जणांच्या जीवावर बेतली, का ठरतेय जीवघेणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल