झारखंडमधील पाकुर जिल्ह्यातील हिरणपूर पोलीस स्टेशन परिसरातील घाघरजानी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेल्या एका 45 वर्षीय महिलेचा जीव जडला. या महिलेच्या प्रेमात गावातील 21 वर्षाचा तरुण आकंठ बुडाला होता. काही वर्षांपासून हे प्रेम प्रकरण लपूनछपून सुरू होते. अखेर गावात याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. त्यानंतर या महिलेच्या पतीने सगळ्या गावासमोर मोठा निर्णय घेतला.
advertisement
गावच्या पंचायतीपर्यंत पोहचले प्रकरण...
महिला आणि तरुणाचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही बातमी गावात पसरताच समाजात खळबळ उडाली आणि प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले. पंचायतीच्या व्यासपीठावर, महिलेचा पहिला पती स्वतः पुढे आला आणि सामाजिक रीतिरिवाजांनुसार झालेल्या मेळाव्यात पत्नीच्या कपाळावरचे सिंदूर पुसले आणि बांगड्या काढल्या. त्यानंतर, त्याच व्यासपीठावर त्याने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. या लग्नात गावकऱ्यांनीही सहभाग घेतला होता आणि हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले होते, जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेवर लोकांचे मत विभागले गेले आहे. काही लोक याला "प्रेमाचे स्वातंत्र्य" आणि "स्वतंत्र विचारसरणी" चे प्रतीक मानत आहेत. त्याच वेळी, काही लोक याला पारंपारिक सामाजिक आणि कौटुंबिक रचनेला मोठा धक्का म्हणत आहेत.
या घटनेवर सध्या प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गावकरी हा परस्पर संमतीने आणि पंचायतीच्या देखरेखीखाली सोडवलेला विषय मानत आहेत, परंतु आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.