समस्तीपूर : पारंपरिक शेती सोडून शेतकरी बांधव आता फळं, भाज्या आणि फूलझाडांच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. इतकंच नाही, तर शेतीपूरक व्यवसायातूनदेखील शेतकऱ्यांचं नशीब उजळू लागलं आहे. एका शेतकऱ्याने तर युट्यूबवरून एग लेयर फार्मिंग शिकून महिन्याला लाखोंची कमाई केली आहे.
बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्याच्या दरबा गावचे हे रहिवासी. कर्पूरी साहनी असं त्यांचं नाव. 2019 साली अंड उत्पादन घेण्यासाठी कोंबड्या पाळायला त्यांनी सुरुवात केली. कोरोना काळात त्यांना तोटा सहन करावा लागला, मात्र तरीही त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला. आज ते याच व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवत असून दोनजणांना रोजगारदेखील देतात.
advertisement
गोठ्यात शेणाच्या वासाने बंद करतो नाक, त्याच शेणापासून तयार होते सुगंधित अगरबत्ती!
अशी केली सुरुवात
आता त्यांना कुक्कुटपालनातून दर महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न मिळतं. कर्पूरी साहनी सांगतात, ते एकदा मुजफ्फरपूर परिसरात त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते. तिथे त्यांनी लोकांना एग लेयर फार्मिंग करताना पाहिलं. त्यांनी या व्यवसायाबाबत लोकांकडे विचारपूस केली, शिवाय युट्यूबवरून या व्यवसायाची माहिती मिळवली. त्यानंतर स्वतः कुक्कुटपालन करण्यास सुरुवात केली. आता ते 4000 कोंबड्या राहतील असं शेत तयार करून दिवसाला 3400 ते 3500 अंड्यांचं उत्पादन घेतात. व्यापारी त्यांच्या शेतात अंडी खरेदी करण्यासाठी येतात.
थंडीत 'ही' सवय सोडा, नाहीतर येईल हार्ट अटॅक, बेतेल जीवावर!
त्याचबरोबर ते सांगतात की, या व्यवसायातून नफाच नफा होतो असं नाही. अंड्यांचा भाव घसरला की तोटादेखील होतो. परंतु अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे दर घसरला किंवा वाढला तरी अंड्यांची मागणी कधीच कमी होत नाही, ही बाब महत्त्वाची आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g