आयआयटीयन बाबा अभय सिंग ग्रेवाल यांच्या कुटुंबात चार लोक आहेत. कुटुंबात आई, वडील आणि एक बहीण असून ती सध्या अमेरिकेत राहते. बाबा अभय सिंह ग्रेवाल यांचे वडील कर्ण ग्रेवाल झज्जर येथील न्यायालयात वकील आहेत. अभय सिंह लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते. त्यांना प्रवास करणे आणि फोटोग्राफीचा खूप छंद होता. दिल्लीमध्ये आयआयटीसाठी कोचिंग घेतली आणि मुंबई आयआयटीमधून मास्टर्स ऑफ डिझायनिंग कोर्स पूर्ण केला.
advertisement
कुंभ मेळ्यातील IIT बाबांना बाहेर काढले, अखाड्याने म्हटले, संन्यासामध्ये...
अभय सिंह दिल्ली आणि कॅनडा येथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र त्यानंतर सर्व काही सोडले आणि ते भारतात परत आले. हिवाळ्यात ते मनाली, शिमला, हरिद्वार यांसारख्या ठिकाणी भटकत असायचे.
वडिलांनी सांगितले की, अभयशी शेवटचे बोलणे 6 महिन्यांपूर्वी झाले होते. त्यानंतर अभय यांनी त्यांचा नंबर ब्लॉक केला. बाबा झाल्यानंतर त्यांचा मुलगा कुटुंबात परत येणे शक्य होईल असे वाटत नाही, परंतु त्यांची इच्छा आहे की तो घरी परतावा.
प्रियकराला तडपवून मारणारी प्रेयसी गुगलमुळे सापडली, चित्रपट कथेला मागे टाकेल..
अभय सिंह यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी मिळवल्यानंतर दिल्ली आणि कॅनडामध्ये नोकरी केली. काही काळ कॅनडामध्ये आपल्या बहिणीसोबत राहिल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि भारतात परत आले. त्यांनी उज्जैनमधील अर्धकुंभात सहभाग घेतला होता आणि सध्या प्रयागराजमधील महाकुंभात उपस्थित आहेत. अभय सिंग यांना फोटोग्राफीचा मोठा छंद आहे आणि त्यांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती, काझा, धर्मशाळा यांसारख्या ठिकाणांची छायाचित्रे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहेत. सोशल मीडियावर ते खूप लोकप्रिय झाले असून त्यांची प्रसिद्धी वेगाने वाढत आहे.
इंग्रजांनी लूट केली नसती तर आज भारत किती श्रीमंत असता? रक्कम वाचून डोळे गरगरतील
वडिलांच्या मते, अभय सिंह यांचे निर्णय त्यांच्यासाठी धक्कादायक होता. परंतु त्याने आपल्या आयुष्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. तरीही कुटुंब त्यांच्या परतीची आशा बाळगून आहे.