म्हणजे, लग्नानंतर मुलगी नाही तर मुलगा रडत रडत आपल्या घरून सासरी जात असेल आणि मुलीच्या घरात 'जावई' म्हणून कायमचा रहाण्यासाठी किंवा नांदण्यासाठी येत असेल तर? ऐकायला थोडं अजब वाटेल, पण भारताच्याच एका कोपऱ्यात अशी एक जमात आहे जिथे ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासुन आनंदाने पाळली जाते. चला, आज जाणून घेऊया या अनोख्या 'मातृसत्ताक' जगाबद्दल.
advertisement
भारतात जिथे आजही अभारताच्या ‘या’ गावात लग्नानंतर मुलगी नाही, मुलाचाच निरोप! सासरी कधीच जात नाहीत मुलीनेक ठिकाणी मुलाला वंशाचा दिवा मानलं जातं, तिथे मेघालय राज्यातील 'खासी' (Khasi) ही जमात स्त्रीशक्तीचा खरा गौरव करताना दिसते. या समुदायाचे नियम आणि परंपरा आजच्या आधुनिक जगालाही विचार करायला लावणाऱ्या आहेत.
1. वंशावळ चालते आईच्या नावाने
जगभरात मुलांच्या नावामागे वडिलांचे आडनाव लावले जाते. मात्र, खासी जमातीमध्ये मुलांच्या नावामागे आईचे आडनाव (Surname) लावले जाते. येथे मुले ही वडिलांच्या नाही तर आईच्या नावाने ओळखली जातात. यालाच 'मातृसत्ताक' समाजव्यवस्था म्हणतात.
2. लेकीला मिळते वारसाहक्क
सामान्यतः वडिलांची संपत्ती मुलाला मिळते, पण खासी समुदायात घराची मालमत्ता आणि वारसाहक्क मुलीला मिळतो. घरातील सर्वात लहान मुलगी ही संपत्तीची मुख्य वारसदार असते. यामुळे मुलींना कधीही परकं मानलं जात नाही, उलट त्या आयुष्यभर आपल्या आई-वडिलांसोबत राहून त्यांची सेवा करू शकतात.
3. नवरदेवाची होते पाठवणी (Groom's Farewell)
सर्वात धक्कादायक आणि वेगळी प्रथा म्हणजे लग्नानंतरची पाठवणी. खासी जमातीत लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपले घर सोडून मुलीच्या घरी म्हणजेच आपल्या 'सासरी' राहायला येतो. येथे मुलाची पाठवणी केली जाते. लग्नानंतर घराची जबाबदारी आणि घरकाम पुरुष सांभाळतात, तर स्त्रिया बाहेरची कामे आणि व्यापार पाहतात.
सोर्स : सोशल मीडिया
4. स्त्री जन्माचा मोठा उत्सव
ज्या समाजात मुलीचा जन्म झाल्यावर चिंता व्यक्त केली जाते, तिथे खासी जमातीत मुलीचा जन्म हा भाग्याचा आणि उत्सवाचा क्षण मानला जातो. जर एखाद्या कुटुंबात फक्त मुलगे असतील, तर ते कुटुंब आपला वंश पुढे नेण्यासाठी मुलगी दत्तक घेण्याला प्राधान्य देतात.
मेघालयातील खासी जमात हे सिद्ध करते की समाज चालवण्यासाठी फक्त पुरुषी सत्ताच गरजेची नसते. स्त्रियांच्या हाती सत्तेची सूत्रं असलेल्या या समाजात गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे आणि महिलांना मिळणारा मान कमालीचा आहे. आजही ही परंपरा तितक्याच अभिमानाने पाळली जाते, जी भारताच्या विविधतेत भर घालते.
