प्रिमियर दारू देखील स्वस्त होणार
पंतप्रधान मोदींनी या कराराचे वर्णन 'मदर ऑफ ऑल डील' असं केलं असून, जागतिक स्तरावर या मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या करारामुळे भारतात आता युरोपीय लक्झरी कार खरेदी करणं स्वस्त होणार आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांवर सध्या आकारला जाणारा 110 टक्के टॅक्स आता थेट 10 टक्क्यापर्यंत खाली येणार आहे. तर सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्रिमियर दारू देखील स्वस्त होणार आहे.
advertisement
वाईन आणि बिअर देखील स्वस्त
युरोपमधून येणारी वाईन आणि बिअर देखील स्वस्त होणार आहेत. वाईनवर सध्या असलेला 150 टक्के टॅक्स आता 20 ते 30 टक्क्यांपर्यंत खाली येईल, तर बिअरवरील टॅक्स 110 टक्के वरून 50 टक्के करण्यात आला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या बाबतीतही मोठा दिलासा देण्यात आला असून, ऑलिव्ह ऑईल आणि इतर वनस्पती तेलांवरील टॅक्स आता शून्य करण्यात आला आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फायदा
भारत सरकारने दरवर्षी 2.5 लाख गाड्यांचा कोटा निश्चित केला असून, टप्प्याटप्प्याने हे शुल्क कमी केले जाईल. यामुळे वाहन क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही या डीलचा मोठा फायदा भारताला होणार आहे. मेडिकल आणि सर्जिकल उपकरणांपैकी जवळपास 90 टक्के साहित्य आता टॅक्स-फ्री होणार आहे. याशिवाय रसायने, विमाने आणि अंतराळ क्षेत्राशी संबंधित उपकरणांवरील टॅक्स पूर्णपणे रद्द किंवा अत्यंत कमी करण्यात आला आहे.
औद्योगिक विकासाला मोठी गती
दरम्यान, मशिनरीवर लागणारा 44 टक्के टॅक्स आणि रसायनांवरील 22 टक्के टॅक्स आता जवळपास संपुष्टात येणार आहे. युरोपीय तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध झाल्यामुळे औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. भारत आणि युरोपमधील हे आर्थिक संबंध भविष्यात जागतिक व्यापाराची समीकरणे बदलवणारे ठरणार आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.
