TRENDING:

Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानची 2 लढाऊ विमानं पाडली, भारतीय सैन्य दलाला मोठं यश

Last Updated:

पाकिस्तानकडून 6 मे पासून सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. इतकच नाही 7 मेपासून रात्री पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांचा डाव उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आता भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारत आणि पाकिस्तानने आता एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. एवढेच नाही तर पाकिस्तानने दिल्लीवर फतह २ क्षेपणास्त्राने हल्ला केला.

भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. दुसरीकडे, भारताने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तानचे तीन हवाई तळ उडवून देण्यात आले आहेत. रावळपिंडी, रफीकी आणि मुरीद हवाई तळांवर पहाटे स्फोट झाले. या स्फोटांनंतर पाकिस्तानने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे.

पाकिस्तानने दिल्लीवर फतह-२ क्षेपणास्त्र डागले होते, जे सिरसा येथील हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले होते. मात्र भारतीय सैन्य दलाने डाव उधळून लावला.  पाकिस्तानकडून 6 मे पासून सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. पाकिस्तानने आता दिल्लीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यदलाने तो हाणून पाडला.

7 मे पासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अजूनही अधिकृत युद्धाची घोषणा करण्यात आली नाही. मात्र सीमेवरील संघर्ष वाढत असून पाकिस्तान आता दिल्लीपर्यंत टार्गेट करत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भारतानेही पाकिस्ताचे सगळे डाव उधळून लावले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल पंप 48 तासांसाठी बंद करण्यात आले. तर दुसरीकडे विमानतळ प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आणि तणावाची मोठी बातमी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement
May 10, 202510:00 AM IST

Ind vs Pak Tension: ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचं पॅटर्न, भारतानं 45 ड्रोन्स उडवले

9 आणि 10 मेच्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. पण भारतानं लद्दाखपासून भुजपर्यंत तब्बल 45 ड्रोन्स शूट करून हल्ले फोल ठरवले.
May 10, 202510:00 AM IST

आदमपूर एअरबेसजवळ मोठे स्फोट — जालंधर हादरलं

जालंधरमधल्या आदमपूर वायुदल स्थानकाजवळ रात्री मोठ्या स्फोटांच्या आवाजामुळे खळबळ माजली. हे ड्रोन हल्ले भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेनं अडवले, पण स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली.
May 10, 20259:59 AM IST

Ind vs Pak Live: पाकिस्तानचे दोन फायटर जेट्स पाडले- एक श्रीनगरजवळ, एक उत्तर काश्मीरमध्ये

भारताने आज पहाटे दोन पाकिस्तानी फायटर जेट्स पाडलेत. एक श्रीनगरजवळच्या लसजन भागात आणि दुसरा उत्तर काश्मीरमध्ये. हे ऐकून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.
advertisement
May 10, 202510:01 AM IST

Ind vs Pak Live Updates: डोडा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन

सीमेवर सुरु असलेल्या गोळीबारामुळे डोडा जिल्हा प्रशासनानं रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांना सांगण्यात आलंय की पुढच्या आदेशापर्यंत घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या जात आहेत. सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे.
May 10, 202510:01 AM IST

भारतीय सैन्याचं मोठं कारनामा, पाकिस्तानी पोस्ट्स आणि दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त

जम्मूजवळून पाकिस्तानकडून ड्रोन लाँच केले जात होते. भारतीय लष्करानं त्या सगळ्या लाँचपॅड्स आणि पोस्ट्स उद्ध्वस्त केल्या. हे फक्त कारवाई नव्हतं, हे ठोस उत्तर होतं.
May 10, 20259:57 AM IST

Ind vs Pak: इस्लामाबादमध्ये पेट्रोल संपलं; 48 तासांसाठी सगळे पेट्रोल पंप बंद

पाकिस्तानमध्ये आता परिस्थिती फारच बिघडलीये. इस्लामाबादमध्ये इंधनाची टंचाई झालीये आणि त्यामुळे सगळे पेट्रोल पंप 48 तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिलेत. लोक अक्षरश: घाबरलेत.
advertisement
May 10, 20259:55 AM IST

Ind vs Pak Live Updates: "आमचं 6 लाखांचं सैन्य, भारताच्या 16 लाखांसमोर काहीच नाही" — पाकचे माजी अधिकारी कबूल करतात

पाकिस्तानच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने म्हटलंय की, “आपल्या 6 लाख सैन्याला भारताच्या 16 लाख सैनिकांसमोर उभंही राहता येणार नाही.” आता त्यांना वाटतंय की फक्त अमेरिका किंवा चीनच पाकिस्तानला वाचवू शकतात.
May 10, 20259:55 AM IST

"IMF पाकिस्तानला पैसे का देतंय?" — ओमर अब्दुल्लांचं जोरदार प्रश्न

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलंय, “IMF पाकिस्तानला बॉम्बसाठी पैसे देतोय का? कारण जे काही पाकिस्तान काश्मीरात करतंय — पूंछ, राजौरी, उरी, तंगधार या सगळ्या भागांवर – ते बघितल्यावर हेच वाटतंय. मग आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटतं तरी काय की या सगळ्यात शांतता येईल?”
May 10, 20257:42 AM IST

Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानची पळताभुई थोडी, 48 तास पेट्रोल पंप बंद राहणार

पाकिस्तानमध्ये घबराट, सरकारने इस्लामाबादमधील सर्व पेट्रोल पंप ४८ तासांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये इंधनाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
advertisement
May 10, 20257:31 AM IST

Pakistan firing shrinkage: श्रीनगर आणि आसपासच्या भागात जोरदार चकमक

श्रीनगर आणि आसपासच्या भागात पाकिस्तानसोबत जोरदार चकमक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय केली आहे.
May 10, 20257:29 AM IST

Ind vs Pak Live Updates: जालंधरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले

जालंधरमधील कांगनीवाल गावात स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले. ड्रोन स्फोटामुळे बाधित झालेल्या घरात राहणाऱ्या सुरजीत कौर म्हणाल्या की, आमच्या घराच्या वर एक लाल रंगाचा फ्लॅश दिसला आणि एक मोठा स्फोट झाला. आम्हाला भीती वाटली. आजूबाजूला अंधार होता. काही वेळाने आम्ही आमच्या घराबाहेर पडलो आणि पाहिले की आमच्या घरांच्या आणि शेजाऱ्यांच्या घरांच्या वरच्या पाण्याच्या टाक्या फुटल्या होत्या. त्यावेळी अंधार पडला होता आणि सर्व दिवे बंद होते.
May 10, 20257:28 AM IST

Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानकडून चार शहरांवर हल्लाचा प्रयत्न, संपूर्ण भारतात हायअलर्ट

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानने भारतातील 4 शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकने उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि सिरसामध्ये हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र भारताने पाकड्यांचा हल्ला परतावून लावला आहे. पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय.
advertisement
May 10, 20257:24 AM IST

Ind vs Pak live: पाकिस्तानचं ऑपेरशन बुनयान उल मर्सूस', भारतीय जवानांनी उधळून लावलं

पाकिस्तानकडून पुन्हा कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात ऑपेरशन बुनयान उल मर्सूस’ केलं. मात्र पाकिस्तानचा दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दिल्लीत हायअलर्ट देण्यात आला असून सध्या दिल्ली पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेले सगळे हल्ले उधळून लावण्यात आले आहेत. पाकिस्तानचं ऑपरेशन बुनयान उल मर्सूस पूर्णपणे फेल गेल्याची माहिती मिळाली आहे.
May 10, 20257:20 AM IST

Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानचा भारतावर मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानकडून भारतावर वारंवार हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता पाकिस्ताननं थेट राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं भारतावर फतेह-2 मिसाईल डागलं. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं चोख प्रत्युत्तर देत हे मिसाईल हवेतच पाडलं. हे मिसाईल हरियाणातील सिरसाजवळ पाडल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतावर हल्ल्याचे पाकचे प्रत्येक प्रयत्न उधळून लावले जाताहेत. भारतानं आपली एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम किती सक्षम आहे याचं वारंवार प्रत्यंतर दाखवून दिलंय.
मराठी बातम्या/देश/
Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानची 2 लढाऊ विमानं पाडली, भारतीय सैन्य दलाला मोठं यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल