TRENDING:

Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBIच्या रडारवर; 30 ठिकाणांवर छापेमारी

Last Updated:

सत्यपाल मलिक यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. सत्यपाल मलिक यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे. याआधी विमा घोटाळ्यातही सीबीआयने मलिक यांच्याविरुद्ध कारवाई केली होती.  सीबीआयने जम्मू काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये किश्तवाड इथं किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टला २२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल कामाचा ठेका देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हा छापा टाकला जात आहे. सत्यपाल मलिक 23 ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांना प्रोजेक्टच्या संबंधित दोन फाइल्सना मंजुरी देण्यासाटी ३०० कोटी रुपयांची लाच दिली गेली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा
मराठी बातम्या/देश/
Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBIच्या रडारवर; 30 ठिकाणांवर छापेमारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल