TRENDING:

शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर, माजी मंत्र्याच्या मुलाला दिली उमेदवारी

Last Updated:

शिंदे गटाचा महाराष्ट्रातील नगराध्यक्ष पदाचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. महायुतीमधील पहिली फूट सिल्लोडमधून पाहायला मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
advertisement

छत्रपती संभाजीनगर:  राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजून युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडनगर परिषदेसाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अब्दुल समीर शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढवणार असून, त्यांचा सामना थेट भाजपशी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिली फूट पडली अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची नगरपरिषदेसाठी जोरदार तयारी झाल्याची चर्चा आहे.अद्याप विरोधकांकडून सिल्लोडमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा सुरू आहे. सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. तर विरोधकांचे मात्र अद्याप एकमत होताना दिसत नाही. शिंदे गटाचा महाराष्ट्रातील नगराध्यक्ष पदाचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. महायुतीमधील पहिली फूट सिल्लोडमधून पाहायला मिळाली आहे.

advertisement

विरोधकांचा गोंधळ वाढला

शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा हा पहिला अधिकृत उमेदवार ठरल्याने सिल्लोडकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, विरोधक मात्र उमेदवारी निश्चित करण्यात अपयशी ठरले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गट यांच्यात सिल्लोडमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही चर्चाच सुरू आहे. एकत्रितपणे निवडणूक लढवायची की स्वतंत्र उमेदवार द्यायचा, याबाबत अजून निर्णय न झाल्याने विरोधकांचा गोंधळ वाढला आहे.

advertisement

प्रचार कार्यालयही थाटले

नगर परिषद निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र आजपासून स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात मात्र राजकीय पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका बघावयास मिळत आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडून मुलगा अब्दुल समीर यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून प्रचार कार्यालयही थाटले.

समीकरणे बदलण्याची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

सिल्लोड परिसरात सत्तार कुटुंबाचा मजबूत राजकीय पाया असून त्यांचा मोठा मतदार वर्ग आहे. स्थानिक पातळीवर अनेक नेते तयारीत असल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे समीर सत्तार यांच्या प्रचाराला स्थानिक तरुणांचा प्रतिसाद मिळत असला तरी विरोधक एकत्र आल्यास लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत प्रचाराला वेग येऊ शकतो. तरी सिल्लोडच्या राजकारणात सत्तार पिता-पुत्र अग्रभागी असले, तरी विरोधक एकत्र आले, तर समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

advertisement

मराठी बातम्या/देश/
शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर, माजी मंत्र्याच्या मुलाला दिली उमेदवारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल