TRENDING:

Exit Poll म्हणजे काय रे भाऊ? आकडे येतात कुठून? जाणून घ्या 8 प्रश्नांची उत्तरं

Last Updated:

What Is Exit Poll - लोकसभा निवडणूकांच्या एक्झिट पोलची आकडेवारी कुठून येते, त्याचा अर्थ काय, त्या संदर्भात नियम काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची उत्तरं जाणून घेऊ या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे चार दिवस उरले आहेत. सातव्या टप्प्याचं मतदान संपल्यावर एक्झिट पोल जारी केले जातील. एक्झिट पोल म्हणजे निवडणूक सर्वेक्षण. त्यातून लोकांचे कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोल खासगी एजन्सी घेतात. या एक्झिट पोलमधून अंदाज येतो, की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. या एक्झिट पोलची (Loksabha Election 2024 Exit Poll) आकडेवारी कुठून येते, त्याचा अर्थ काय, त्या संदर्भात नियम काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची उत्तरं जाणून घेऊ या.
Exit Poll म्हणजे काय रे भाऊ
Exit Poll म्हणजे काय रे भाऊ
advertisement

एक्झिट पोल कसं करतात?

प्रत्येक टप्प्याचं मतदान सुरू असताना न्यूज चॅनेल व पोलिंग एजन्सीचे अधिकारी तिथे असतात. मतदार मत देऊन आल्यावर त्यांना कुणाला मत दिलं ते विचारण्यात येतं आणि त्याने दिलेल्या उत्तराची नोंद केली जाते. मत दिल्यावर मतदाराचं मन फ्रेश असतं. त्याचाच फायदा पोलिंग एजन्सी घेते. मग सर्व आकडेवारी एकत्र करून सरासरी काढून एक्झिट पोलमध्ये दाखवली जाते.

advertisement

एक्झिट पोल अचूक असतात का?

नाही, एक्झिट पोल अचूक आहेत, असं म्हणता येत नाही. एक्झिट पोलचं काम फक्त कल दाखवणं हे आहे. ते एखाद्याच्या बाजूने असलेली लाट दाखवू शकतात; पण आकडे नेमके असतील याची शक्यता कमी असते. तरीही इतिहास पाहिल्यास काही वेळा एक्झिट पोल अचूक असल्याचं, तर काही वेळा ते खोटे ठरल्याचं सिद्ध झालंय.

advertisement

पहिला एक्झिट पोल केव्हा झाला होता?

1957 च्या लोकसभा निवडणुकीत पहिलं निवडणूक सर्वेक्षण करण्यात आल्याचं म्हटलं जातं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हे सर्वेक्षण केलं होतं. त्यानंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दूरदर्शनने याच एजन्सीला नियुक्त केलं आणि त्यानंतर एक्झिट पोलचा ट्रेंड सुरू झाला.

ओपिनियन पोल व एक्झिट पोल एकच?

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील (Lok Sabha Election 2024 Exit Poll Marathi) सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे ओपिनियन पोल निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी घेतले जातात, तर एक्झिट पोल मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर घेतले जातात. दुसरा फरक म्हणजे ओपिनियन पोलमध्ये सर्वांशी बोललं जातं; पण एक्झिट पोलमध्ये फक्त मतदारांशीच बोललं जातं.

advertisement

एक्झिट पोलचे नियम

Representation of the People Act,1951 च्या सेक्शन 126A अंतर्गत, मतदानादरम्यान कोणतीही पोलिंग एजन्सी आपला एक्झिट पोल जारी करू शकत नाही. एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांसाठी नियम बनवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. पोलिंगवेळी कोणताही आकडा जारी करायचा नाही, हा सर्वांत मोठा नियम आहे.

एक्झिट पोल कुठे पाहता येणार?

एक्झिट पोल (Exit Poll News In Marathi) बरेच न्यूज चॅनल व डिजिटल वेबसाइट दाखवतील.

advertisement

एक्झिट पोल किती वाजता सुरू होणार?

एक्झिट पोलचा ठरावीक काळ नसतो; पण दुपारी तीनपासून ते सुरू होतात. मतदान झाल्यानंतरच एक्झिट पोलचे आकडे जारी करता येतात.

मराठी बातम्या/देश/
Exit Poll म्हणजे काय रे भाऊ? आकडे येतात कुठून? जाणून घ्या 8 प्रश्नांची उत्तरं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल