कर्नाटकमध्ये काँग्रेसला धक्का
कर्नाटकमध्ये 28 जागांपैकी भाजप 21 ते 24 जागा मिळवू शकते. तर काँग्रेसच्या खात्यात 3 ते 7 जागा मिळू शकतात. यात भाजपप्रणीत एनडीएला 23-26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडी 3 ते 7 लोकसभा सीट मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात सत्ता असूनही काँग्रेसला या ठिकाणी जास्त जागा मिळत नसल्याचे दिसत आहे.
advertisement
कर्नाटकमध्ये 2 टप्प्यात मतदान
कर्नाटकातील लोकसभेच्या 28 जागांसाठी 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. 26 एप्रिल रोजी कर्नाटकातील उडुपी-चिकमगलूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगलोर उत्तर, बंगळुरू मध्य, बंगळुरू दक्षिण, चिक्कबल्लापूर आणि कोलार या 14 जागांवर मतदान पार पडलं. तर 7 मे रोजी चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा या उर्वरित 14 जागांवर मतदान झाले.
वाचा - शिंदेंची लेक दिल्ली गाठणार की सातपुते डाव उलटवणार? Exit Poll चा अंदाज
2019 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
गेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये कर्नाटकात दोन टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 18 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल 2019 रोजी मतदान झाले. भाजपने (एनडीए) 25 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. तर जेडीएसने 1 जागा जिंकली. अपक्ष (भाजपने समर्थित) 1 जागा जिंकली.