TRENDING:

असा व्यवसाय ज्यामुळे बदललं व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य, आज हजारो लोकांना देतोय रोजगार

Last Updated:

या कंपनीच्या डायरेक्टरने छोट्या स्तरापासून आपल्या कामाची सुरुवात केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आदित्य कृष्ण, प्रतिनिधी
प्रेरणादायी कहाणी
प्रेरणादायी कहाणी
advertisement

अमेठी, 8 डिसेंबर : सरकार रोजगार निर्मितीसाठी, तसेच विविध प्रकारचे उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे. अशा परिस्थितीत अमेठीमध्येही रोजगार निर्माण होत आहे. यासोबतच सध्याच्या काळात तरुणांमध्ये विशेषत: ज्यांना इंडस्ट्रीची आवड आहे, त्यांच्यासाठी हेचरीज आणि पोल्ट्री फार्म नवीन व्यवसाय म्हणून उदयास येत आहेत.

सातत्याने लोक अर्ज भरून आपला व्यवसाय सुरू करत आहेत. उत्तरप्रदेशातील अमेठी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या जात आहेत. यासोबतच पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी विभागाकडून जागेनुसार मदत दिली जात आहे.

advertisement

अमेठीचा विचार केला असता सध्या जिल्ह्यात जगदीशपुर क्षेत्रात एका मोठ्या कंपनीने तरुणांना रोजगार दिला आहे. या कंपनीच्या डायरेक्टरने छोट्या स्तरापासून आपल्या कामाची सुरुवात केली. यानंतर ते आज हजारो बेरोजगारांना आपल्या कंपनीत रोजगार देत आहे. या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे.

ही कंपनी अमेठी जिल्ह्यातील जगदीशपूर भागातील व्यावसायिक क्षेत्रात सुरू आहे. याठिकाणी कोंबडीचे खाद्य तयार करणाऱ्या ठिकाणाबरोबरच लवकरच पशुखाद्यासह इतर पदार्थही येथे तयार केले जातील.

advertisement

कंपनीचे डायरेक्टर काय म्हणाले -

ही कंपनी अमेठीसह अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे. आमचा प्लांट 10 एकरांवर पसरलेला आहे. सध्या आम्ही या कंपनीत कोंबड्यांसाठी चारा तयार करतो. पण लवकरच आमची कंपनी जनावरांच्या चाऱ्यासह इतर गोष्टी तयार करणार आहे, अशी माहिती कंपनीचे डायरेक्टर सुशील कक्कर यांनी दिली.

आम्ही हा व्यवसाय अगदी लहान पातळीपासून सुरू केला होता. यानंतर आज आम्ही खूप मोठ्या स्तरावर पोहोचलो आहोत. यासोबतच या व्यवसायाशी निगडित लोकांचेही भविष्य उज्ज्वल होत आहे आणि त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या कंपनीचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
असा व्यवसाय ज्यामुळे बदललं व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य, आज हजारो लोकांना देतोय रोजगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल